सातारा : पाय घसरून पडल्याने महाबळेश्वरात एकाचा मृत्यू

पाय घसरल्याने ते थेट पंधरा ते वीस फूट उंचीवरून डोक्यावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली
Dr APJ Abdul Kalam Complex One worker dies in Mahabaleshwar after slipping satara
Dr APJ Abdul Kalam Complex One worker dies in Mahabaleshwar after slipping satara sakal
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुलामध्ये असलेल्या टेलरिंग दुकानाबाहेरील पडवीच्या पत्र्यावर प्लास्टिक टाकताना पाय घसरून पडल्याने जगदीश दिगंबर शिंत्रे वय ५६ रा. नामदेव सोसा, महाबळेश्वर यांचा मृत्यू झाला. पंधरा ते वीस फुट उंचीवरून डोक्यावर पडल्याने व गंभीर दुखापत झाली त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम व्यापारी संकुल असून या संकुलामध्ये ४० गाळेधारक व्यवसाय करत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी या गाळेधारकांना पालिकेकडून हे गाळे देण्यात आले होते. या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या काही गाळेधारकांनी आपल्या दुकानांबाहेर पावसापासून बचावासाठी छोटीशी पडवी बांधली आहे. शहर व परिसरात गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु असून जगदीश शिंत्रे हे या पावसात आपल्या दुकानाबाहेरील पडवीच्या पत्र्यावर चढून प्लॅस्टिक बांधत होते.

त्यांचा पाय घसरल्याने ते थेट पंधरा ते वीस फूट उंचीवरून डोक्यावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचे भाऊ व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी त्यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी वाई येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगदीश दिगंबर शिंत्रे हे येथील अर्बन को ऑप बँकेचे पिग्मी एजंट म्हणून गेली अनेक वर्षे काम करत असून त्यांचे टेलरिंगचे दुकान आहे. शिंत्रे यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी दुःख व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com