अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; बुधला तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

बुधच्या हद्दीत ट्रॅक्‍टरच्या साह्याने अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.
Sand Transport
Sand Transportesakal
Updated on

पुसेगाव (सातारा) : बुध (ता. खटाव) येथे पुसेगाव-फलटण रस्त्यावर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर (Sand Transpor) कारवाई करून ट्रॅक्‍टर, ट्रॉली व गौण खनिजासह (वाळू) तीन लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Police Action On Sand Transport In Budh Village Satara News)

बुधच्या हद्दीत ट्रॅक्‍टरच्या साह्याने अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार आज स्वतः किंद्रे, तसेच पुसेगाव पोलिस (Police Action) ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी बुध हद्दीत पुसेगाव-फलटण रस्त्यालगतच्या एमएसईबी कार्यालयासमोर सापळा लावला असता तेथे ट्रॉलीद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रॅक्‍टर निदर्शनास आला.

परंतु, पोलिसांचा संशय आल्याने ट्रॅक्‍टरचालक मारुती ऊर्फ पिनू शामराव चव्हाण ट्रॅक्‍टर ट्रॉली तेथेच सोडून पळून गेला. या कारवाईत हवालदार कुंभार, श्री. झुंजार, श्री. धुमाळ, श्री. कर्पे, श्री. पवार, श्री. कुदळे, श्री. माने यांनी सहभाग घेतला. या घटनास्थळावरून पोलिसांनी एक ट्रॅक्‍टर, ट्रॉली व गौणखनिजासह एकूण तीन लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतचा गुन्हा पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

Police Action On Sand Transport In Budh Village Satara News

Sand Transport
साताऱ्यात ऑक्सिजनचा तुटवडा; ऑडिटसाठी तपासणी पथकाची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14
Hard Work Pays Off as Kival Youth Clear Police Recruitment Exams
Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर
Marathi News Esakal
www.esakal.com