'आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला'; ढेबेवाडी 'आरोग्य'त 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : तब्बल 14 वर्षे उलटूनही येथील ग्रामीण रुग्णालयातून पुरेशा उपचार सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागत आहे. त्यामुळे सलाईनवर असलेल्या येथील आरोग्य सेवेकडे आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच एक दिवसाचा बंद पाळून रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी घेतला आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष भेटून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

येथे 14 वर्षांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण समाधानी चेहऱ्याने बाहेर पडलाय, असे सहसा बघायला मिळत नाही. सध्या एका डॉक्‍टरांवर संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी असून, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि सर्जन नसल्याने विविध उपचार सुविधा ठप्प आहेत. सध्या तेथे उपलब्ध एकमेव डॉक्‍टर हे स्त्रीरोगतज्ज्ञ असले, तरी त्यांच्या जोडीला भूलतज्ज्ञ व सर्जन नसल्याने सिझिरियन किंवा अन्य शस्त्रक्रियासाठी रुग्णांना कऱ्हाडला पाठवावे लागते. एक्‍सरे मशिन व टेक्‍निशियन आहे; परंतु रेडिओलॉजिस्ट व अस्थिरोग तज्ज्ञ नाही, ईसीजी मशिन आहे; परंतु रीडिंग करण्यास फिजिशियन नाही. 

अशा विचित्र परिस्थितीमुळे "आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला,' असे अनुभव वारंवार येत असल्याने रुग्ण येथे येण्याऐवजी दुसऱ्या दवाखान्यात जाणे पसंत करत आहेत. त्याचा परिणाम ओपीडीवर तर झालेला आहेच शिवाय बाजारपेठेलाही त्याचे चटके सहन करावे लागत आहेत. व्यापारी संघटनेच्या बैठकीत याप्रश्नी गांभीर्याने चर्चा झाली. रुग्णालयाचा कारभार सुधारत नसल्याने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. एक दिवसाच्या आंदोलनातून प्रश्न न सुटल्यास बेमुदत ठिय्या ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी रुग्णालयात जाऊन याप्रश्नी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाबाबत त्यांना माहिती दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com