Flipkart sale : हे ४ स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी

या फोनची मूळ किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन केवळ १० हजार ७९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.
Flipkart sale
Flipkart salegoogle

मुंबई : अवघ्या काही दिवसांत, फ्लिपकार्ट आपला बिग बिलियन डेज २०२२ सेल सुरू करणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला खूप कमी किंमतीत अनेक उत्तम फोन मिळणार आहेत. फ्लिपकार्ट सेल दरम्यान, तुम्ही अनेक कंपन्यांकडून मोठ्या सवलतींसह महागडे स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सेल विनाशुल्क EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करू शकाल. (Big Billion Days Sale)

Flipkart sale
Flipkart sale : Moto 5G smartphoneवर १७ हजारांची सूट

१. POCO M4 5G

Poco च्या या 5G फोनच्या बेस व्हेरिएंटची मूळ किंमत १५ हजार ९९९ रुपये असली तरी, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलदरम्यान तुम्हाला हा फोन फक्त ९ हजार ७४९ रुपयांमध्ये मिळू शकेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. तसेच यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

२. Infinix Note 12 5G

या फोनची मूळ किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन केवळ १० हजार ७९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 6GB रॅम, 64GB स्टोरेज, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा तसेच 5000 mAh बॅटरीचा समावेश आहे.

Flipkart sale
iphone 13वर मिळवा भरगोस सवलत

३. Samsung Galaxy F23 5G

फ्लिपकार्टच्या लिस्टमध्ये या फोनच्या बेस मॉडेलची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे, परंतु या सेलमुळे तुम्हाला यावर मोठी सूट मिळणार आहे. सेल दरम्यान तुम्हाला हा फोन फक्त १० हजार ९९९ रुपयांमध्ये मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळत आहे.

४. POCO M4 Pro 5G

या Poco 5G फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे, परंतु Flipkart वर चालू असलेल्या ऑफरमुळे तुम्हाला हा फोन फक्त ११ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

यासोबतच तुम्हाला 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com