

cyber security Whatsapp web
sakal
New Delhi: ऑफिसमधील किंवा सार्वजनिक ठिकाणच्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरल्यानंतर केवळ ब्राउजरचा टॅब बंद करून बाहेर पडत असाल तर सावध व्हा. असे केल्याने तुमचे खाते लॉगआउट होत नाही. कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲपचे लॉग-इन सेशन सुरू राहिल्यास दुसरी व्यक्ती तुमचे खासगी मेसेज वाचू शकते. तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवून आर्थिक फसवणूकही करू शकते. याबाबत सरकारने गंभीर इशारा दिला आहे.