Chandrapur News: बकरीच्या पिल्लाला माणसासारखा चेहरा? चंद्रपूरमधील आश्चर्यकारक घटना

Chandrapur Trending News in marathi: या विचित्र पिल्लाच्या चेहऱ्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. दाढी आणि माणसासारखा चेहरा असलेल्या या पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Chandrapur Trendig News
Chandrapur Trendig News esakal

चंद्रपूर जिल्ह्यातील चेकबरडी गावातील शेतकरी मोतीराम आत्राम यांच्या घरी एक अनोखी घटना घडली आहे. त्यांच्या बकरीला दोन पिले झाली, ज्यापैकी एक पिल्लू सामान्य होते, पण दुसरे पिल्लू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण हे पिल्लू एखाद्या माणसासारखे दिसते.

विचित्र पिल्लूची रचना

हे बकरीचे पिल्लू माणसासारखे डोळे, दाढी आणि चेहरा असलेले होते. जन्मताच हे पिल्लू नाजूक होते आणि आत्राम परिवाराने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. या विचित्र पिल्लूला बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी उसळली.

तज्ञांचे मत

तज्ञांच्या मते, हे फक्त जनुकीय बदलाचा परिणाम आहे. अशा विचित्र घटनांमुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण होते, परंतु हे नैसर्गिक घटकांमुळेच घडते. मोतीराम आत्राम यांनी या पिल्लूला गावातच खड्डा खणून पुरले.

Chandrapur Trendig News
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला ७ जुलैपासून होणार सुरूवात, 1000 यज्ञांचे पुण्य देणाऱ्या यात्रेचे महत्त्व घ्या जाणून

सोशल मीडियावर चर्चा

या विचित्र पिल्लाच्या चेहऱ्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. दाढी आणि माणसासारखा चेहरा असलेल्या या पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया आणि चर्चा अजूनही सुरूच आहेत.

Chandrapur Trendig News
Maratha Reservation : ''सगेसोयरे'च्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत तथ्य नाही'', राज्य सरकारचा कोर्टात युक्तिवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com