बदलीला १७ महिने; पशुधन विकास अधिकारी निमोणला रुजू होईन

बदलीला १७ महिने; पशुधन विकास अधिकारी निमोणला रुजू होईन
Published on: 
पशुधन विकास अधिकारी रुजू होईना आठ गावांतील पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न भाऊसाहेब गोसावी सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. २४ : प्रशासकीय बदलीचा आदेश होऊन तब्बल १७ महिने उलटले, तरी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी निमोण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रुजू झाले नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान आधिकारी रूजू होत नसल्याने पंचक्रोशीतील आठ गावातील पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक येथील श्री संत यांची पशुधन विकास आधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. १५ मे २०२५ गिरणारे (ता. नाशिक) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ मधून निमोण (ता. चांदवड) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली होती. मात्र, १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ते रुजू झाले नसल्याची माहिती आहे. आठ गावची अडचण निमोण, कानडगाव, कुंदलगाव, वडनेरभैरव, दरेगाव, डोंगरगाव आणि दहेगाव आदी गावांतील पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी या दवाखान्यावर आहे. कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार आहे. प्रभारी अधिकारी आठवड्यातून एखाद-दुसऱ्या दिवशीच उपलब्ध होत असल्यास हजारो जनावरांना नियमित उपचार, तपासणी आणि लसीकरणाची सुविधा कशी मिळणार, असा प्रश्न आहे. कोट पशुधन आधिकारी का रुजू झाले नाहीत. याची माहिती घेत आहे. बदली झाली असेल तर त्यांनी हजर व्हावे यासाठी योग्य कार्यवाही करू. - सदाशिव बेडक्याळे, (उपायुक्त पशुसंवर्धन नाशिक) बदली आदेश होऊन १७ महिने झाले प्रशासकीय बदली असताना देखील हे अधिकारी निमोण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रुजू झाले नाहीत. आधिकारी नसल्याने मुक्या जनावरांची देखील गैरसोय होत आहे. - पंकज दखणे (माजी सरपंच, विद्यमान सदस्य निमोण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com