सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन
Published on: 
ॲंकर NSK26H31363 जळगाव : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सुरू होणाऱ्या सीआयएससीई १७ वर्षाआतील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे मशाल प्रज्वलित करुन उद्‌घाटन करताना विद्यार्थी तथा खेळाडू. ------- सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन उपशीर्षक अनुभूती स्कूलमध्ये आयोजन; देशातील १५ संघ, २७० खेळाडूंचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाआतील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२६ स्पर्धेचे दिमाखदार उद्‌घाटन रविवारी (ता.४) अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झाले. देशभरातील १५ संघांचे २७० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान साखळी व बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत. उद्‌घाटनप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ॲपेक्स कौन्सिलचे सदस्य तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीस दास, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन आदी उपस्थित होते. सुरुवातीला अशोक जैन यांच्या हस्ते अनुभूती निवासी स्कूलचा ध्वज फडकाविण्यात आला. विद्यार्थिनींनी ‘अब मुश्किल नहीं..’ हे स्वागतगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एरोबिक्सच्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. अशोक जैन व अतुल जैन यांच्या हस्ते कृती ओसवाल हिच्याकडे क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मशाल रन झाली. राष्ट्रीय क्रिकेटपटू अन्मय जैन, रणवीर राणा, कृती ओसवाल यांच्यासह खेळाडूंनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. प्राचार्य देबाशीस दास यांनी सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. अतुल जैन यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चौकट १५ संघांतील २७० खेळाडूंचा सहभाग सीआयएससीई बोर्डच्या १७ वर्षाआतील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार-झारखंड, उत्तर भारत, ईशान्य भारत, केरळ, कर्नाटक-गोवा, छत्तीसगड तसेच तमिळनाडू-पुद्दुचेरी-अंदमान निकोबार या १५ संघांचा सहभाग आहे. अनुभूती निवासी स्कूल ही या स्पर्धेची मुख्य आयोजक असून, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेत साखळी सामन्यांसह एकूण २५ सामने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com