घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
----- बस-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी मालेगाव, ता. ९ ः सटाणा रस्त्यावर आघार बुद्रुक अलीकडील रावळगाव फाट्यावर बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. श्‍यामराव विठ्ठल खैरनार (वय ७२, रा. आघार बुद्रुक) दुचाकीने (एमएच ४१ एएन १९९४) मालेगाव सटाणा रस्त्याने आघार बुद्रुक गावाकडे घरी जात असताना रावळगाव फाट्याजवळ मागून आलेल्या बसने (एमएच १४ ई ८७२२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात श्‍यामराव खैरनार यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. किल्ला पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल झाला. ------ अपघातात महिला जखमी मनमाड-मालेगाव रस्त्यावर महाजन मोटर्ससमोर चारचाकी वाहनाने रिक्षास धडक दिल्याने रिक्षातील महिला जखमी झाली. संजय आनंद जाधव (वय ५२, रा. नानगाव, पुणे) याने विरुद्ध बाजूने वाहन चालवून रिक्षाच्या उजव्या बाजूस धडक दिली. अपघातात रिक्षातील सिंधूबाई सुभाष सोनवणे (वय ५०, रा. कौळाणे, ता. मालेगाव) यांना गंभीर दुखापत झाली. किल्ला पोलिस ठाण्यात संजय जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. ---- दुचाकी लंपास वळवाडे (ता. मालेगाव) येथील योगेश उत्तम सोनवणे (वय ४४) यांची ४० हजारांची दुचाकी (एमएच ४१ बीसी ३२१२) चोरट्यांनी लंबविली. ६ ऑक्टोबरला दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान वडनेर गावातील एनडीसीसी बँकेसमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, तरुणीचा विनयभंग मालेगाव ः येथील गुलशने इब्राहिम भागात फातमा शेख अब्दुल रहीम (वय २७) व शेख मुजफार शेख युनूस (रा. गुलशने इब्राहिम) यांचे प्रेमसंबंध असून, ते दोन वर्षापासून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत आहेत. ५ ऑक्टाेबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास अकरा हजार कॉलनीतील घरात फातमा शेख असताना मुजफार शेखने लाकडी दांड्याने तिला मारहाण केली. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पवारवाडी पोलिस ठाण्यात फातमा शेखच्या तक्रारीवरून शेख मुजफार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com