उमराणे डोंगरगाव रस्त्यावर छोटा हत्ती गाडी व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी

उमराणे डोंगरगाव रस्त्यावर छोटा हत्ती गाडी व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी
Published on: 
छोटा हत्तीच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी देवळा, ता. २३ : तालुक्यातील उमराणे- डोंगरगाव रस्त्यावर छोटा हत्ती मालवाहू वाहनाने मोटारसायकलला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. गुरुवारी (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास महात्मा फुलेनगर शिवारात पावजी देव फाट्याजवळ ही घटना घडली. या अपघातात चंद्रभान काशिनाथ बस्ते (वय ४८, रा. रामनगर, दहिवड) यांचा मृत्यू झाला. सुनंदा सोमनाथ पगारे (वय ४३, रा. उमराणे) आणि देविदास दादाजी मोरे (वय ५०) हे दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमराणेकडून डोंगरगावच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती मालवाहू वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला आणि मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील चंद्रभान बस्ते यांचा मृत्यू झाला, तर मोरे आणि पगारे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राऊत, हवालदार राहूल शिरसाट, दिलीप सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत चंद्रभान बस्ते यांच्यावर रामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फोटो - चंद्रभान बस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com