सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
Published on: 
ॲंकर NSK26H31658 जळगाव : सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या उत्तर प्रदेश संघासोबत मान्यवर. ‘सीआयएससीई’ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता (उपशीर्षक) नॉर्थ इंडिया उपविजेता; महाराष्ट्राला तृतीय क्रमांक, अनुभूती निवासी स्कूलमध्ये स्पर्धेचे आयोजन सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ७ : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल येथे आयोजित सातव्या सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाने विजेतेपद पटकावले. तर नॉर्थ इंडिया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्‍ट्राचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला. देशभरातील १५ प्रादेशिक संघांनी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूलचे क्रीडांगण, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळील मैदान तसेच एमके स्पोर्ट्स, सावखेडा येथील मैदानांवर स्पर्धेतील सामने रंगले. स्‍पर्धेतील अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या. विजयासाठी १४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नॉर्थ इंडिया संघाला १९.५ षटकांत १४० धावांच करू शकला. महाराष्ट्राचा तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाच्या सामन्यात तामिळनाडू, पुद्दुचेरी व अंदमान-निकोबारच्या संयुक्त संघाने निर्धारित १५ षटकांत ६ बाद ९९ धावा केल्या. महाराष्ट्राने हे आव्हान १४.३ षटकांत चार फलंदाजांच्या योगदानावर सहज पार केले. पारितोषिक वितरण समारंभास अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, अनुभूती स्कूलचे विक्रांत जाधव, भिकन खंबायत आदी उपस्थित होते. स्‍पर्धेतील सर्व पारितोषिके जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडतर्फे प्रायोजित केली होती. चौकट उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पुरस्कार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात आले. उत्तर प्रदेशच्या अविरलने पाच सामन्यांत नऊ बळी घेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. महाराष्ट्राच्या आदित्य गुरदासणीने पाच सामन्यांत १६५ धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला. नॉर्थ इंडियाच्या प्रारब्ध सेठीने पाच डावांत १०४ धावा करण्याबरोबरच नऊ बळी घेतल्याबद्दल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com