SKD26B04334
शिंदखेडा : नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांना निवेदन देताना काँग्रेसचे सुनील चौधरी, प्रमोद सीसोदे, जे. पी. बोरसे, दीपक अहिरे आदी.
----------
शिंदखेड्यात काँग्रेसकडून
काळ्या फिती लावून निषेध
शिंदखेडा, ता. ८ : राष्ट्रीय काँग्रेसच्या आवाहनानुसार ८ ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून तहसील कार्यालयासमोर शांततामय निषेध नोंदविला. या वेळी निदर्शने करण्यात आली. तसेच नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष डॉ. जे. पी. बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिसोदे, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता व उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, इंडिया आघाडीतील खासदार निवडणूक आयोगाकडे जात असताना त्यांना अडविणे, ताब्यात घेणे व गैरवर्तन करणे ही अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फसवणारे बाब आहे. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून, निवडणूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शकता, निष्पक्षता व उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी परीक्षित देशमुख, देविदास भदाणे, उदय पाटील, प्रवीण कोळी, विनोद पाटील, पंकज निकम, गजेंद्र भामरे, अजय तमखाने, आनंद कसबे, महेश मालचे, श्याम महाले, रमेश महाले, मोहन सोनवणे, गजानन पाटील, सुनील गागरे, इरफान पिंजारी यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.