२२ हजार ७७४ सभासद अर्ज प्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

२२ हजार ७७४ सभासद अर्ज प्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
Published on: 
राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या सभासद अर्जांची आज सुनावणी सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ५ ः येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासदत्वासाठी अर्ज केलेल्या २२ हजार ७७४ नागरिकांच्या प्रकरणात नुकत्याच झालेल्या सुनावणीत ५ हजार ४८३ प्रतिवादींतर्फे ॲड. राजेंद्र सोनवणे यांनी वकीलपत्र दाखल केले. उर्वरित प्रतिवादींतर्फे पुढील सुनावणीत वकीलपत्र सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी (ता. ६) होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सभासद होण्यासाठी २२ हजार ७७४ नागरिकांनी प्रत्येकी ५०१ रुपये शुल्कासह संस्थेकडे अर्ज केले होते. संस्थेने हे अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर संबंधित अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेतली होती. या सर्वांना सभासद करून घेण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी ३० मे रोजी देऊन ३० दिवसांच्या आत सभासद करून घेण्याचे निर्देश संस्थेला दिले होते. या आदेशाविरोधात संस्थेने ३ ऑगस्टला नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यावर १ सप्टेंबरला सुनावणी घेतली होती. विभागीय सहनिबंधकांनी अपिलाची दखल घेत, सर्व प्रतिवादींना नोटिस बजावून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ सप्टेंबरपर्यंत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. तर, बुधवारी झालेल्या सुनावणीत ५ हजार ४८३ प्रतिवादींतर्फे ॲड. राजेंद्र सोनवणे यांनी वकीलपत्र दाखल केले. आता मंगळवारी (ता. ६) होणाऱ्या सुनावणीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com