पान दोन
12864
वासन नगर: सह्याद्री युवक मंडळाच्या दांडिया मैदानाच्या कामाचा प्रारंभ करताना उपमहापौर विलास शिंदे. शेजारी अशोक मुर्तडक, अमोल जाधव, अनिल गायकवाड, रवींद्र गामणे आदी.
सह्याद्री युवक मंडळाच्या दांडिया मैदानाचे भूमिपूजन
सोन्याच्या नथी, पैठण्या आणि गृहोपयोगी वस्तूंची लयलूट
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता. ६ : वासननगर येथील गामणे मैदानावर शिवसेनेच्या सह्याद्री युवक मंडळातर्फे दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५० हजार चौरस फूट मैदानात रंगणाऱ्या या दांडिया उत्सवात तब्बल १० लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव, अनिल गायकवाड, रवींद्र गामणे आणि अजय दहिया यांनी दिली.
सोमवारी (ता. ५) सकाळी उपमहापौर विलास शिंदे, महानगर प्रमुख बंटी तिदमे, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडप उभारणी व मैदानाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महिला आणि पुरुषांसाठी या दांडिया महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे. मैदानात १५ फूट उंच दुर्गादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे.
महोत्सवात स्पर्धकांसाठी दररोज सांघिक आणि वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार असून, परिसरातील शाळांमधील शिक्षिका परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या प्रसंगी सोमनाथ बोराडे, दीपक आव्हाड, सागर देशमुख, अजय पाटील, शैलेश काळे, अरविंद अत्तरदे, विष्णू उगले, आप्पा बाविस्कर, नारायण बच्छाव, नारायण बडगुजर, रमेश जगताप, अनिल पाटील, दिलीप गामणे, संतोष गामणे, किरण सोनवणे, जगदीश नागरे, मयूर सोनवणे, सौरभ सोनवणे, दिलीप जायभावे, प्रतीक गामणे, किरण नागरे, रवी गायकवाड, विनायक कुऱ्हाडे, मयूर आव्हाड, सिद्धार्थ दहिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
सुरक्षा अन् आपत्कालीन व्यवस्था
महिलांच्या सुरक्षेसाठी २० महिला बाऊर्न्स तैनात करण्यात येणार असून, संपूर्ण मैदान सीसीटीव्हीच्या निगराणीत असेल. मंडळाने स्वतःची ५० सदस्यांची सुरक्षा टीम तयार केली आहे. तसेच बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधांयुक्त तात्पुरती चौकी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात राहील.