धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- शेतीवरून हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी धुळे : धनूर (ता. धुळे) येथे शेतीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. विजय अभिमन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार रोहित हेमंत चौधरी, गणेश हेमंत चौधरी व हिरामण विठ्ठल चौधरी यांनी त्यांना मारहाण करून लोखंडी सळईने दुखापत केली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हिरामण चौधरी यांच्या फिर्यादीनुसार विजय अभिमन चौधरी व दीपक अभिमन चौधरी यांनी मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला. दोन्ही घटना सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. -- ड्युटीवरून हाणामारी; बसचालकाविरुद्ध गुन्हा धुळे : ड्युटी लावण्याच्या कारणावरून धुळे मध्यवर्ती बसस्थानकात दोन कर्मचाऱ्यांत वाद होऊन हाणामारी झाली. यश नरेंद्र हिंगोणे यांच्या फिर्यादीनुसार चालक महेंद्र राजेंद्र पाटील यांनी धुळे-नाशिक मार्गावर ड्युटी लावल्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- वाहनचालकाला मारहाण करून लूट धुळे : शहरातील चितोड चौफुलीजवळ वाहनचालकाला अडवून मारहाण करत मोबाईल व रोकड हिसकावून नेल्याची घटना घडली. अब्दुल जबार अब्दुल रौफ (वय २६, रा. जावत कॉलनी, भारतनगर, अकोट) हा तरूण चितोड चौफुलीजवळून जात असताना तीन ते चार संशयितांनी त्याचे वाहन अडवले. त्याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व पॅन्टच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. अब्दुल जबार याच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - वाहनातून पडून मजुराचा मृत्यू धुळे : चौगाव शिवारातील कुसुंबा- मालेगाव रस्त्यावर भरधाव आयशरमधून पडल्याने संजय मोतीलाल वाघ (वय ३०, रा. खुडाणे निजामपूर, ता. साक्री) याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर घडली. आयशरचालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने वाघ धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू धुळे : शहरातील न्यू बालाजीनगर येथे कौटुंबिक वादातून विवाहितेने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाला. वैशाली गोपाल भामरे (वय २८, रा. न्यू बालाजीनगर, साक्री रोड, धुळे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती गोपाल किशोर भामरे (वय ३४) हा किरकोळ कारणांवरून वाद घालून मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वैशाली यांनी २४ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास घरी गळफास घेतला. पिना सायमन पावरा (रा. खैरखुटी, ता. शिरपूर) यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - विषारी औषधप्राशन मुलीचा मृत्यू धुळे : फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने कल्याणी राजेश पवार (१५, रा. सालटेक, ता. साक्री) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार सप्टेंबरला कुटुंबीय शेतात गेले असताना ती घरी एकटी होती. सायंकाळी वडील घरी परतल्यानंतर ती औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळली. तिला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - नकाणे शिवारात कंटक्टर लंपास धुळे : नकाणे (ता. धुळे) शिवारातील हॉटेल ट्वेल टेबलमागील पांझरा नदीकाठावरून महावितरण कंपनीचे ११ केव्हीचे कंटक्टर चोरीस गेले. त्यांची किंमत ३० हजार आहे. तुळशीरामनगर कक्षाच्या सहायक अभियंता अर्चना मोरे यांच्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com