डॉक्टरांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

डॉक्टरांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 33332 धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष संवाद कार्यक्रमानंतर भावी डॉक्टरांसोबत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते. शेजारी अधिष्ठाता डॉ. अजित पाठक, डॉ. अरुण मोरे, प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर, विद्यार्थी आदी. -- वैद्यकीय क्षेत्रात पैशांपेक्षा माणुसकी मोलाची -- भाग्यश्री विसपुते : धुळ्यातील भावी डॉक्टरांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : एखादा गरीब शेतकरी आजारी पडतो, तेव्हा उपचारासाठी पैसे कुठून आणायचे आणि कुटुंबाचे पुढे काय होणार, अशी चिंता त्याला असते. अशा वेळी डॉक्टरांनी दिलेला आधार आणि आपुलकीचे दोन शब्द रुग्णासाठी जगण्याची नवी आशा ठरतात. त्यामुळे डॉक्टर होताना केवळ पदवी आणि पैशांचा विचार न करता, उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णामध्ये माणुसकी पाहा. रुग्णाच्या खिशात किती पैसे आहेत यावरून उपचारांचा दर्जा ठरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. - श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय आणि परिचर्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या विशेष संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित पाठक, डॉ. अरुण मोरे, ‘सेवांकुर’ संस्थेचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर, पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. - शिक्षणातील अडचणी जाणून घेताना जिल्हाधिकारी विसपुते यांनी सांगितले, श्रीमंताप्रमाणेच गरीब रुग्णालाही उत्तम उपचार मिळाले पाहिजेत. डॉक्टरांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप केवळ हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी नसून त्यामागील वेदना समजून घेण्यासाठी असतो. विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर ग्रामीण भाग आणि खेड्यापाड्यांत सेवा देण्याची तयारी ठेवावी. आजची तरुण पिढी मोबाईल, समाजमाध्यमे आणि व्यसनांच्या आहारी जात तासन्‌तास वेळ वाया घालवत आहे. हा मौल्यवान वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी वापरा. मोबाईलच्या पडद्यापुरते आयुष्य मर्यादित न ठेवता पुस्तकांशी मैत्री करा, मैदानावर जा आणि आवडी जोपासा, असे आवाहन त्यांनी केले. - १४-१ ..चौकट.. १४-१ विशेष मार्गदर्शन उपक्रम महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टरांनी शाळांमध्ये जाऊन नीट परीक्षा, अभ्यास नियोजन आणि वैद्यकीय शिक्षणातील संधींबद्दल शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच जिल्ह्यातील १३ ते १६ वयोगटातील विद्यार्थिनींसाठी पुढील १० दिवसांत ‘प्रजनन आरोग्य आणि योग’ या विषयावर तज्ज्ञांमार्फत विशेष मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात येईल. याशिवाय पदव्युत्तर परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी ॲपवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी मोफत शैक्षणिक ॲप विकसित केले जाईल, यासाठी गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे. या उपक्रमांच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शिक्षणाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com