संविधान संरक्षण समिती

संविधान संरक्षण समिती
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H31721 धुळे : शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा या मागणीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करतांना संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते. --- गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा --- संविधान संरक्षण समितीची पोलिस अधीक्षकांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर व प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच, महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. धुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि गुंडगिरी संपविण्यासाठी पोलिसांनी व्यापक व प्रभावी मोहीम राबवावी, गोपनीय लेखी किंवा तोंडी माहिती मिळताच तातडीने चौकशी करून कारवाई केली जावी, महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या व त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोकळे भूखंड, रस्ते आणि महामार्गालगतच्या परिसरात सायंकाळी सातनंतर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी व या भागांत पोलिसांची गस्त वाढवावी, रात्रीच्यावेळी ज्या ठिकाणी नागरिकांना विशेषत: एकट्या व्यक्तीला मोटारसायकलवरून किंवा पायी जाण्यास भीती वाटते अशा संवेदनशील भागात सायंकाळी सातपासून गस्ती पथके तैनात करण्यात यावीत आदी मागण्या संविधान संरक्षण समितीने निवेदनातून केल्या. संविधान संरक्षण समितीचे ज्येष्ठ निमंत्रित सदस्य हरिश्चंद्र लोंढे, आरपीआय (गवई गट) सरचिटणीस प्रा. बाबा हातेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गो. पी. लांडगे, पंडित गोसावी, पी. टी. बेडसे, मनोहर मोहिते, कॉ, एल. आर. राव, पोपटराव चौधरी, राजेंद्र अहिरे, श्रीकृष्ण बेडसे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दीपक सोनवणे, धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ, नवल ठाकरे, मोहंमद जैद, आसिफ शेख, सादिक शेख आदींनी मागण्यांचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले. ---
Marathi News Esakal
www.esakal.com