चाचडगाव शिवारात पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित गुटख्यासह कार ताब्यात

चाचडगाव शिवारात पोलिसांची कारवाई;   प्रतिबंधित गुटख्यासह कार ताब्यात
Published on: 
१६-१ दिंडोरी पोलिसांकडून प्रतिबंधित गुटखा जप्त वणी : दिंडोरी ते पेठ महामार्गावरील चाचडगाव शिवारात कृषी महाविद्यालयामागे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारवर दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह सुमारे ७ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हेमंत साहेबराव शिरसाठ (३८, रा. शिरवाडे वणी, ता. निफाड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळी चाचडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. संशयित कारची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री, वाहतूक, वितरण व साठवणुकीस प्रतिबंध असलेला विमल पानमसाला, हिरा पानमसाला, आरएमडी पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. यात ८७ हजार १२० रुपये किमतीचा विमल पानमसाला, ९ हजार ६८० रुपयांचा व्ही-१ टोबॅको, ७२ हजार रुपयांचा हिरा पानमसाला, ३० हजार रुपयांचा रॉयल ७१७ टोबॅको, ६३ हजार रुपयांचे प्रिमियम आर.एम.डी. बॉक्स आणि २५ हजार २०० रुपयांचे आर.एम.डी.चे लहान बॉक्स असा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. वाहतुकीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी सुमारे ५ लाख रुपयांची कारसह पोलिसांनी ७ लाख ८७ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com