फोटो-22964
सिन्नर ः पूर्व भागात दुष्काळी स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना उदय सांगळे. शेजारी कृषी अधिकारी व शेतकरी.
सिन्नर तालुक्यात सरसकट
पंचनामे करण्याची मागणी
भाजप पदाधिकाऱ्यांकडून दुष्काळाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ८ ः शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असून, या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरसकट पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार आहे. पंचनामे करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी दिली.
भाजपतर्फे तालुक्याच्या पूर्व भागातील मिरगाव, दुशिंगपूर, वावी, घोटेवाडी येथे दुष्काळी पाहणी दौरा करण्यात आला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, ज्ञानेश्वर दुरगुडे, मंडळ कृषी अधिकारी विनोद सांगळे, उपकृषी अधिकारी दादासाहेब जोशी, महादेव मुसळे, संगीता दवंगे, गायत्री जाधव, राजश्री हासे, सहाय्यक कृषी अधिकारी निकम आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले होते.
उदय सांगळे यांनी सरसकट पंचनामे होण्यासाठी आपण ही मागणी वरिष्ठ स्तरापर्यंत मांडणार असून, पाहणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचाही प्रयत्न केला जाईल. अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न कठीण होणार आहे. त्यासाठी टँकर, चारा डेपोचे नियोजन गरजेचे असून, त्या दृष्टीनेही पाठपुरावा आवश्यक आहे.