NVL26B01136
देवपूर : गर्भवती महिला व नवजात शिशूंना मोफत ड्रेसचे वाटप करताना डॉ. कीर्ती ठाकरे, डॉ. योगेश ठाकरे यांच्यासह उज्वला ठाकरे, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. अभय शिनकर, डॉ. विशाल पाटील.
-------
गर्भवती महिला, नवजात शिशूंना ड्रेसचे वाटप
सेवाभावाचा जागर जपणारा ठाकरे दाम्पत्याचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : देवपूर धुळे येथील ठाकरे हॉस्पिटलच्या १८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. कीर्ती ठाकरे आणि डॉ. योगेश ठाकरे यांच्या वतीने धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिला व नवजात शिशूंना मोफत ड्रेसचे वाटप करण्यात आले.
आरोग्यसेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी धुळे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उज्वला ठाकरे, सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. अभय शिनकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. दिनेश दहिते, डॉ. विवेक जाधव आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. समीर शेख उपस्थित होते. हॉस्पिटलच्या वतीने डॉ. नरेंद्र पाटील, मनोज घोडके, सचिन भावसार, कुणाल परदेशी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.