वेध शारदीय घटस्थापनेचे : शारदीय नवरात्रोत्सवासाठी इगतपुरीचे घाटनदेवी ट्रस्ट व प्रशासन सज्ज : २२ कॅमेऱ्यांची राहणार नजर : उत्सव काळात यंदा प्लास्टीक बंदीचा संकल्प :

वेध शारदीय घटस्थापनेचे :  शारदीय नवरात्रोत्सवासाठी इगतपुरीचे घाटनदेवी ट्रस्ट व प्रशासन सज्ज : २२ कॅमेऱ्यांची राहणार नजर : उत्सव काळात यंदा प्लास्टीक बंदीचा संकल्प  :
Published on: 
पान-२ मेन करणे ------------------- IGT26B08777, IGT26B08778, IGT26B08779 इगतपुरी : घाटनदेवीच्या मंदिराची करण्यात आलेली सजावट. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी सजवण्यात आलेला मांडव तर शेवटच्या छायाचित्रात घाटनदेवीची मूर्ती. (छायाचित्रे : विजय पगारे, इगतपुरी) --------------- वेध शारदीय घटस्थापनेचे--लोगो ----------- घाटनदेवी नवरात्रोत्सवात २२ कॅमेऱ्यांची नजर ------------ ट्रस्ट व प्रशासन सज्ज : उत्सव काळात प्लास्टिक बंदीचा संकल्प, यात्राकाळात महामार्गावर एकेरी वाहतूक ------------- विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.९ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत तथा समस्त भाविकांचे आराध्यदैवत घाटनदेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवारपासून (ता.११) सुरुवात होत आहे. ११ ते २० ऑक्टोंबर दरम्यान शारदीय यात्रा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती घाटनदेवी ट्रस्टचे अध्यक्ष भारत साळी यांनी दिली. नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर घाटनदेवी मंदिराची रंगरगोटी व परिसर स्वच्छ करण्यात आला. ------------ यात्रोत्सव सुरक्षित व काळजीपूर्वक होण्यासाठी २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सोबतच पिण्याच्या पाणी व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, रुग्णवाहिका, नगरपालिकेतर्फे अग्निशामक वाहन, शौचालय व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिक दिव्यांगसाठी त्वरित दर्शन व्यवस्था, ऊनपावसाच्या बचावासाठी दर्शन रांगेत कापडी मांडव ताडपत्रीसह व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत मंदिर खुले राहणार आहे. नवरात्री काळात कॅरिबॅग व प्लॅस्टिक मुक्त यात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, कोकण, मुंबई, ठाणे, पालघर भागातून सुमारे ५ ते ७ लाख भाविक येण्याचा अंदाज यात्रा नियोजन प्रमुख तथा नगरसेवक किरण फलटणकर यांनी व्यक्त केला आहे. १६-१ मंदिर ४ ते १२ पर्यत खुले राहणार यात्रोत्सव काळात भाविकांना ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा योग्य पद्धतीने पोहोचविण्याच्या दृष्टीने सुविधा केंद्र, तात्पुरते कार्यालय स्थापन केले जाणार आहे. या कार्यालयाचा हेतूने भाविकांच्या अडीअडचणीवर देवस्थानतर्फे सहकार्य करण्याचा उद्देश असुन पाणपोई,देणगी काउंटर, प्रसादविक्री, प्राथमिक आरोग्य केंद्र चोवीस तास सुरु ठेवण्यात येणार आहे. उत्सव काळात मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ या वेळेत खुले राहणार आहे. ध्वनिक्षेपक, पथदीप व आरोग्य सुविधा आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार असून पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, पोलिसमित्र व स्वयंसेवक कार्यरत राहतील असेही सांगण्यात आले. उत्सव काळात रोज पहाटे काकड आरती व घाटनदेवीची पंचामृत महापूजा होईल. ११ ऑक्टोबरला सकाळी दहाला महापूजा झाल्यानंतर घटस्थापना होऊन उत्सवाला सुरुवात होणार आहे. सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन ट्रस्ट व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ---------------- १६-२ चौकट महामार्गावर असणार एकेरी वाहतूक घाटनदेवी मातेचे मंदिर मुंबई आग्रा महामार्गालगतच असल्याने यात्रोत्सव काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना अथवा अपघात घडू नये यासाठी घाटनदेवी मंदिराकडे जाण्यायेण्यासाठी एकेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांनी दिली. यात्राकाळात भाविकांनी एकेरी मार्गाचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन इगतपुरी पोलिस स्थानक प्रशासन व घोटी टॅबच्या वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. ------------- घाटनदेवी ट्रस्ट, प्रशासन सज्ज घाटनदेवी मंदिर नवरात्रयात्रेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. तहसीलदार अभिजित बारवकर, नगरपरिषद व पोलिस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भारत साळी, ताराचंद भरिंडवाल, ओमप्रकाश तिवारी, राजेश गुप्ता, नीलकमल रावत, नरेश गुप्ता, श्यामसुंदर पुरोहित, रामगोविंद यादव, शांताराम रिखे, भूषण चांदवडकर, शैलेश शर्मा, माणिक भरिंडवाल, जयदीप लद्दड, राजेश गुप्ता, किरण फलटणकर आदी प्रयत्नशील आहेत. भाविकांनी, नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com