टुडे ४ : शहर- जिल्हा कॉमन
----
लोगो : एनआयई
NSK26H33355
जळगाव : पारोळा तालुक्यातील बाहुटे येथील ग्लोबल मिशन स्कूल या शाळेत विद्यार्थ्यांना ‘सकाळ- एनआयई’ अंकाचे वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) चेतन परदेशी, जयदीप पाटील, राकेश पाटील, सचिन जोशी, मनोहर पाटील, राजेंद्र शर्मा, उमाकांत बुंदेले.
------
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘एनआयई’ उपयुक्त
उपशीर्षक
मनोहर पाटील : ग्लोबल मिशन स्कूलमध्ये ‘सकाळ-एनआयई’ अंकाचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी आणि विविध क्षेत्रातील ज्ञानातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ‘सकाळ- एनआयई’ उपयुक्त साप्ताहिक अंक आहे, असे मत ग्लोबल मिशन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील यांनी व्यक्त केले.
पारोळा तालुक्यातील बाहुटे गावात स्थित या शाळेत ‘सकाळ- एनआयई’ अंकाचे विमोचन व वितरण शुक्रवारी (ता.२३) एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले, त्यात श्री. पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शाळेचे शैक्षणिक सल्लागार तथा नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, ‘सकाळ’ खानदेश आवृत्तीचे ब्युरो चीफ सचिन जोशी, वितरण व्यवस्थापक राकेश पाटील, सहकारी चेतन परदेशी, शाळेचे प्राचार्य उमाकांत बुंदेले, पालक संघाचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा, विवेक साळुंखे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. अनेक थोर पुरुषांच्या आयुष्यात वृत्तपत्र वाचनाने बदल घडवून आणल्याचे सांगत ‘सकाळ-एनआयई’चा अंक नियमितपणे वाचन करून, त्यातून अभ्यास करावा, असे आवाहन केले.
तत्पूर्वी मान्यवरांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात एनआयई अंकाचे वितरण करण्यात आले. प्रेरणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
----------