Satana News : खाकी वर्दीतील देवमाणूस! भुकेल्या माय-लेकाची व्याकूळता पाहून सटाणा पोलीस निरीक्षकांचा माणुसकीचा हात

'साहेब… आठ दिवस झाले, घरात खायला दाणा नाही. मी आणि माझं लेकरू उपाशी आहोत…' डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर हतबलता आणि पदरात दोन-तीन वर्षांचं लेकरू घेऊन आलेल्या एका महिलेचे हे शब्द.
Police Inspector yogesh patil

Police Inspector yogesh patil

sakal

Updated on: 

सटाणा - 'साहेब… आठ दिवस झाले, घरात खायला दाणा नाही. मी आणि माझं लेकरू उपाशी आहोत…' डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर हतबलता आणि पदरात दोन-तीन वर्षांचं लेकरू घेऊन आलेल्या एका महिलेचे हे शब्द ऐकताच सटाणा पोलीस ठाण्यात क्षणभरासाठी वातावरण स्तब्ध झाले. कौटुंबिक वादातून पतीने घराबाहेर काढल्याने निवाऱ्यासह अन्नाचाही प्रश्न निर्माण झालेल्या या महिलेची व्यथा ऐकून सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मन हेलावून गेले आणि खाकी वर्दीतील माणुसकीचे अत्यंत हृदयस्पर्शी दर्शन घडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com