PML26B10237
पिंपळगाव बसवंत ः सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पोलिस निरीक्षक गणेश गुरव व कर्मचारी.
-------------------
पिंपळगावला पीकअपसह १०० सिलिंडरसह जप्त
---------------
९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.९ ः घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या कारवाईत एचपी कंपनीचे १०० सिलबंद गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.८) पिंपळगाव पोलिसांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी सिद्धार्थनगर परिसरात सापळा रचून संशयित मुकुंद काशिनाथ नेर आणि दुर्गेश दिलीप शिंदे (दोघेही रा. शांतीनगर, सिडको, नाशिक) यांना ताब्यात घेतले.
संशयितांकडून महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून प्रत्येकी १४.२ किलो वजनाचे एचपी कंपनीचे १०० सिलबंद घरगुती गॅस सिलिंडर वाहून नेले जात असल्याचे आढळले. या वाहतुकीसंदर्भात आवश्यक पावत्या, बिले आणि परवान्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी सिलिंडर आणि वाहन जप्त केले.
१६-१
९ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत ३ लाख ३४ हजार ६०० रुपये किमतीचे १०० गॅस सिलिंडर तसेच ६ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ९ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी अतुल अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गुरव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक रोहिदास भोर, अंमलदार विकास वाळुंज, योगेश देशमुख आणि नितीन गाढवे यांनी कारवाईत भाग घेतला.
----------------