खासदार वाजेंनी मांडली भारताची सामाजिक विकासाची भूमिका

खासदार वाजेंनी मांडली भारताची सामाजिक विकासाची भूमिका
Published on: 
SNR26B22917 जागतिक व्यासपीठावर वाजेंची ‘समावेशक भारत’ची भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सामाजिक विकास, सुरक्षा आणि समान संधींवर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या तिसऱ्या समितीतील सामाजिक विषयावरील चर्चेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारताची भूमिका मांडली. सामाजिक विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी संधी, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या सामाजिक विकासाचा आढावा घेताना वाजे यांनी डिजिटल व आर्थिक समावेशन, अन्नसुरक्षा, आरोग्य सुविधा, परवडणारी घरे, गरिबी निर्मूलन आणि कामगारांचे सामाजिक संरक्षण या मुद्द्यांचा उल्लेख केला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेशी जोडण्याची गरज व्यक्त करत त्यांनी ई-श्रम पोर्टलसह विविध उपाययोजनांकडे लक्ष वेधले. ‘विकसित भारत @ २०४७’चा उल्लेख ‘विकसित भारत @ २०४७’चा उल्लेख करताना विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, सामाजिक विषमता कमी करणे आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे वाजे यांनी सांगितले. आरोग्य, अन्न, निवारा आणि रोजगार या मूलभूत गरजांकडे मानवी विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरजही त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com