अतिक्रमण, मासविक्री अन् हप्तेखोरीवरून महापौरांचा संताप

अतिक्रमण, मासविक्री अन् हप्तेखोरीवरून महापौरांचा संताप
Published on: 
टुडे पान २ : मेन फिचर NSK26H31816 जळगाव : महापालिकेच्या महाभेत बोलताना महापौर दीपमाला काळे. शेजारी आयुक्त आदित्य जिवने, उपमहापौर मनोज चौधरी आदी. -- अतिक्रमण, मासविक्री अन् हप्तेखोरीवरून महापौरांचा संताप सर्वांच्या बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश; नगररचनाकार अमोल पाटलांच्या सेवा समाप्तीचा ठराव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शहरातील अतिक्रमण, अनधिकृत मासविक्री, कथित हप्तेखोरी आणि महापौरांच्या नावाचा गैरवापर करून पैसे वसूल करण्याच्या मुद्द्यांवरून शुक्रवारी (ता. ९) झालेल्या महापालिकेच्या महासभेत जोरदार खडाजंगी झाली. महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेच्या आवारात स्वतःच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना दुजाभाव का केला जातो, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकार्यांसह सर्व कर्मचार्यांच्या बदल्या करा असे आदेश महापौरांनी महासभेत आयुक्त आदित्य जिवने यांना दिले. दरम्यान, महासभेच्या सुरुवातीला अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त आदित्य जिवने आणि नगररचना अधिकारी शर्मा उपस्थित होते. सभेत अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजला. सात तास झालेल्या महासभेत २८ विषयापैकी २ विषयांना तत्त्वता मान्यता देण्यात आली तर शासकीय वैद्यकीय महाविद्याल व विभागीय क्रीडा संकुलाला वाघुर वाहिनीवरून पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्ताव महासभेने अलनिनोचा प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याने भविष्यात शहरातील पाणी टंचाई होण्याची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे हा प्रस्ताव सभागृहाने अमान्य केला. दुपारी सव्वाबारा वाजता सुरू झालेली सात चालली. कारवाईत दुजाभाव का? ६ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यापासून शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि महापुरुषांच्या पुतळ्यांभोवतीच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे कशी होतात, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला. टॉवर चौकात हंगामी विक्रेत्यांवर कारवाई केली जाते; मग कायमस्वरूपी हातगाड्या लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महापौरांच्या नावे पैसे घेतात गणेश कॉलनीत गणपती स्टॉलधारकांकडून लक्ष्मण नावाच्या व्यक्तीने महापौरांच्या नावाने १,५०० रुपयांची पावती देऊन पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. महापौरांचे नाव पुढे करून अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली. हल्ल्याप्रकरणी आयुक्तांना जाब महापालिका आवारात गुरुवारी (ता. ८) एका हॉकर्सधारकाने महापौरांच्या वाहनावर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आयुक्तांना फोन केला असता, ‘महापौरांच्या मौखिक आदेशावरून’ असा उल्लेख करून संबंधित विभागाला आदेश का दिले, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या आवारात घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा जाब विचारत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मासविक्रीच्या अतिक्रमणांचाही मुद्दा दरम्यान, भंगार बाजारातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून शिवसेना सदस्य नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी २९ मार्केटवर कारवाई करण्याचे आव्हान दिले. तसेच शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना निवडक विक्रेत्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दा महासभेत उपस्थित झाला. अनधिकृत मासविक्रीची दुकाने आणि हातगाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अतिक्रमणांवरही समान निकषांनुसार कारवाई करा असा पटेल यांनी आरोप केले. त्यावर महापौरांनी संताप व्यक्त करत अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई सुरूच राहील, अशी भूमिका स्पष्ट केली. उपमहापौर मनोज चौधरी यांनीही पटेल यांच्या संकूलावरील कारवाईच्या विधानाला प्रत्युत्तर देत शब्द व्यवस्थित वापरण्याच्या सूचना दिल्या. या वादामुळे महासभेतील वातावरण चांगलेच तापले. चौकट नगररचनाकारांच्या सेवा समाप्तीचा ठराव महापालिकेतील नगररचना विभागामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक, नागरिक तसेच स्थापत्य विशारद यांच्या बांधकाम परवानग्यांसह कामे प्रलंबित आहे. नगररचनाकार अमोल पाटील माहितीच्या अधिकारातील माहिती देत नाही, संबंधित कागदपत्र देत नाही, महत्त्वाच्या फाइल गहाळ आहेत. तसेच पैसे देखील विविध परवानग्यांसाठी मागतात. त्या पलीकडे संबंधित व्यक्ती पैसे घ्या पण काम करून द्या, असे सांगून देखील परवानग्या देत नसल्याने अमोल पाटील यांची सेवा माघारीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी यावेळी मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com