चोरट्यांचा दिवाळी धमका एकाच रात्रीत तीन घरफोडले

चोरट्यांचा दिवाळी धमका एकाच रात्रीत तीन घरफोडले
Published on: 
NSK26H35126 व NSK26H35127 जळगाव : कटरने कडीकोयंडा तोडताना सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे. ---- दिवाळीत एकाच रात्री तीन घरफोडी --- लाखोंचा ऐवज लंपास; शिट्टी वाजल्याने चोरट्यांचा काढता पाय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : दिवाळीच्या सुटीत कुटुंबीय बाहेरगावी असताना, चोरट्यांनी एकाच रात्रीत श्‍यामनगरमध्ये तीन घरे फोडली. रविवारी (ता. १५) पहाटे घडलेल्या घटनेत तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घरमालक बाहेरगावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. जळगाव शहराला लागून असलेल्या गिरणा पंपींग रोडवरील श्यामनगरात एकाच रात्री चोरट्यांनी तीन बंदघरे फोडून ऐवज लंपास केला. घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडण्यासाठी चोरट्यांनी कटरचा वापर केल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. कुलूप, कडीकोयंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले व कपाटांचे लॉकर उघडून त्यातील ऐवज घेऊन पसार झाले. चोरट्यांनी फोडलेल्या तीन घरांपैकी एक कुटुंब रविवारी सायंकाळी घरी परतले. त्यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड गेल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. अन्य दोन कुटुंबीय अद्याप गावीच आहेत. ते सोमवारी परतणार असून, त्यानंतरच किती ऐवज चोरीला गेला, हे स्पष्ट होणार आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद श्‍यामनगरातील तिन्ही घरे फोडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सुरुवातीला दोन चोरटे दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ त्यांचा एक साथीदार तेथे येतो व तिघे घरात प्रवेश करताना, त्यांनतर एका पाठोपाठ बाहेर पडताना दिसत आहेत. शिट्टी वाजली तीन घरे फोडल्याची घटना ज्या गल्लीत घडली, त्या गल्लीतच निवृत्त पोलिस उपनिरीक्षक जगदीश बोरनारे वास्तव्यास आहेत. पहाटे त्यांना काही आवाज आल्याने ते उठले व शिटी वाजविली. तो आवाज ऐकून चोरटे पळून गेले. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात न आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. डोक्यावर टोपी-मास्क तिन्ही चोरट्यांनी खास प्रकारची टोपी व मास्क लावले होते. जेणेकरून सीसीटीव्हीत चित्रीतही झाले, तरी ओळख पटायला नको. तिघांच्या पाठीवर कॉलेज सॅग, हातात मोजे व बॅटरी होत्या. -------- यांची फोडली घरे जिल्‍हा न्यायलयात कार्यरत किरण वासेवाये यांच्या घरात दागिन्यासह मोठी रक्कम चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने अद्याप नेमका ऐवज काय व किती गेला, हे कळू शकले नाही. वासेवाये यांच्या शेजारीच महेश जगन्नाथ पाथरकर यांचे घर फोडले आहे. ते छायाचित्रकार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ते मलकापूरला गेले होते. त्यांच्या घरातूनही कपाटातून आठ ते दहा हजारांची रोकड गेल्याचे त्यांनी सांगितले. टीव्हीही काढून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. शिवाय यांच्याच घराच्या दाराचा कडीकोयंडा कटरने कापताना चोरटे सीसीटीव्हीत दिसत आहेत. वरील दोन्ही घरांच्या पुढील गल्लीतील तोफिक तडवी किनगावकर यांच्या घराचाही कडीकोयंडा कापून चोरट्यांनी चोरी केली. त्यात त्यांच्या घरातील टीव्ही चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. कालच ते घरबंद करून गावाला गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.