महापालिकेच्या पाण्यावर आणखी भार नको

महापालिकेच्या पाण्यावर आणखी भार नको
Published on: 
(नळाचे किंवा पाण्याचे चित्र वापरावे) महापालिकेच्या पाण्यावर आणखी भार नको वैद्यकीय व क्रीडा संकुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा; ‘वाघूर’च्या उचलक्षमतेवर चिंता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहराला सध्या दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करावा लागत असताना महापालिकेच्या वाघूर योजनेतून आणखी साडेपाच एमएलडी पाणी बाहेर वळविण्याचा प्रस्ताव महासभेत आला आहे. यात चिंचोली येथील शासकीय वैद्यकीय संकुल आणि मेहरूण शिवारातील विभागीय क्रीडा संकुलासाठी हे पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र, यामुळे भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही प्रकल्पांसाठी शासनाने स्वतंत्र पाणीपुरवठ्याचा पर्याय शोधावा, अशी भूमिका भाजप नगरसेवकांच्या बुधवारी झालेल्या महासभेच्या पूर्वतयारी बैठकीत मांडण्यात आली. महापालिका प्रशासनाने ९ ऑक्टोबरच्या महासभेसमोर यासंदर्भातील प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावानुसार दोन्ही संकुलांना मिळून दररोज ५.५ एमएलडी पाणी देण्यात येणार आहे. मात्र, शहरासाठी वाघूरमधून आधीच दररोज सुमारे ९० एमएलडी पाणी उचलले जाते. ही पाणीउचल करण्यासाठी पंप २० ते २१ तास चालवावे लागतात. त्यामुळे विद्यमान व्यवस्थेतून आणखी पाणी वळविल्यास शहराच्या नियमित पुरवठ्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, अशी चिंता बैठकीत व्यक्त झाली. तर वैद्यकीय संकुल आणि विभागीय क्रीडा संकुल या महत्त्वाच्या प्रकल्पांना पाणी देण्यास विरोध नसून, त्यासाठी शहराच्या वाट्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही, अशी स्वतंत्र व्यवस्था राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासनाने करावी अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. वाढीव भागाचा विचार करा शहराची वाढती गरजही विचारात घ्या असा मुद्दा नगरसेवकांनी मांडला. जळगावची हद्द विस्तारत असून लोकसंख्याही वाढत आहे. सुप्रीम कॉलनीसह शहरालगतच्या भागांना पाणीपुरवठा करतानाच यंत्रणेची कसरत होत आहे. खेडी, सावखेडा, कानळदा रस्ता परिसरातील वाढीव वस्त्यांनाही अपेक्षित पाणीपुरवठा करता येत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणण्यात आले. चौकट अन्य गावांकडून मागणी होणार दरम्यान, वाघूर योजनेतून या दोन प्रकल्पांना पाणी दिल्यानंतर भविष्यात उमाळे, चिंचोली, कुसुंबा यांसारख्या परिसरातील गावांकडूनही महापालिकेकडे पाण्याची मागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे एका निर्णयामुळे भविष्यात मोठी मागणी निर्माण होऊ नये, यासाठी आताच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com