विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफीसला भेट

विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफीसला भेट
Published on: 
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H31812 धुळे ः जागतिक टपाल दिनानिमित्त जय हिंद कॉलनी टपाल कार्यालयाला भेटीप्रसंगी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विसपुते विद्यालयाचे विद्यार्थी. --- विद्यार्थ्यांची टपाल कार्यालयाला भेट जागतिक टपाल दिनानिमित्त विसपुते विद्यालयाचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः डिजिटल युगातही टपाल खात्याचे महत्त्व टिकून असून, त्याच्या अविरत आणि योगदानपूर्ण सेवेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ‘जागतिक टपाल दिना’चे औचित्य साधून बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील जय हिंद टपाल कार्यालयाला क्षेत्रभेट दिली. तसेच विद्यालयात जागतिक टपाल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उपशिक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी टपाल कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी पोस्टमास्टर यांची मुलाखत घेऊन टपाल सेवेचा इतिहास, पत्र व्यवहाराची प्रक्रिया, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पत्र, पार्सल सेवा, तसेच टपाल बचत बँक आणि विविध बचत योजनांची माहिती जाणून घेतली. कार्यालयात दैनंदिन कामकाज कसे चालते, पत्रांची वर्गवारी कशी केली जाते आणि पत्रे अंतिम घटकापर्यंत कशी पोहोचविली जातात याचे प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थी भारावून गेले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधींनी टपाल कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जय हिंद टपाल कार्यालयाचे सब पोस्टमास्टर शैलेंद्र वाघ यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी आधुनिक युगातही आपल्या नातेवाइकांना पत्रे लिहून ती टपाल पेटीत टाकण्याचा आनंद घेतला. मुख्याध्यापक पी. बी. पाटील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. या भेटीत विद्यार्थी प्रतिनिधी ओम पवार, सनी अहिरे, अश्विनी गवळी, पूनम लगडे, साक्षी गायकवाड, अमित भिल, तेजस्विनी कोळी, मोनाली बागूल आदी विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, तसेच जय हिंद कॉलनी सब पोस्ट ऑफिसचे शैलेंद्र वाघ, प्रणिता येवले, जयश्री अमृतकर, टिना सोमवंशी, विनायक जोशी, अनुप जोशी व माधुरी बागूल यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com