कार्तिकी एकादशी यात्रेसाठी समूहासाठी थेट गावातून बस

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी समूहासाठी थेट गावातून बस
Published on: 
कार्तिकी एकादशीसाठी समूहासाठी थेट गावातून बस एसटी विभागाचे पंढरपूर यात्रेसाठी विशेष नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत व्‍यवस्‍था केली आहे. एखाद्या गावातून ४५ प्रवासी भाविकांच्‍या समुहाने मागणी केल्‍यास थेट गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्‍ध केली जाणार आहे. तसेच अन्‍य प्रवाशांसाठी बसस्‍थानकांहून बसगाड्या उपलब्‍ध असतील. मंगळवार (ता. १७) पासून २६ नोव्हेंबरदरम्‍यान २०२६ या कालावधीत ही यात्रा भरणार असून, २१ नोव्हेंबरला भागवत एकादशीचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या गावातून ४५ प्रवाशांचा समूह एकत्र आल्यास, त्या तालुक्यातील आगाराकडून थेट संबंधित गावात बस पाठवली जाईल. तसेच, बसस्थानकावर ४५ प्रवासी उपलब्ध झाल्यास तेथूनही पंढरपूरसाठी जादा बस सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. या विशेष बससेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आपल्या तालुक्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक विभाग नियंत्रकांनी केले आहे. ---चौकट यांच्याशी साधा संपर्क नाशिक-१ आगारासाठी नीलेश चौधरी ९९६०५२३५८१, हेमंत नेरकर ९४२०६१५२८७ यांच्‍याशी संपर्क साधता येईल. नाशिक-२ साठी रितेश फुलपगारे ७७२१०२९९३९, विक्रम नागरे ८१४९५१४९२२, तर मालेगाव आगारासाठी विजयकुमार पाटील ९९२२८६८७९१, मनमाडसाठी संदीप बेलदार ९३७०७०८६६९, सटाण्यासाठी हेमंत पगार ९२७१६९२०६३, सिन्नर- सविता काळे ९१३००५८६३९, नांदगाव प्रवीण हिरे ९९६०४५२१८३, इगतपुरी- एजाज शेख ९३७३३५७७५४, लासलगाव- प्रशांत गुंड ७५८८०९३५९३, कळवण- प्रमोद जगताप ८८०६४१४१७३, पेठ- मनिषा देवरे ९२०९२७९२९९, येवला- किरण धनवटे ९८८१३२९४९४, पिंपळगाव हरिश भोई ९८३४२२५३५८ यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.