-सिंहस्थाच्या पर्वारंभाचा निनाद गोदातीरी घुमणार

-सिंहस्थाच्या पर्वारंभाचा निनाद गोदातीरी घुमणार
Published on: 
फोटो : H31485 ‘कोजागरी’ला ५११ सामूहिक शंखनादाने होणार ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ - सिंहस्थाच्या पर्वारंभाचा निनाद गोदातीरी घुमणार - ध्वजारोहण सोहळ्यातही शंखनादाची योजना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : शंखनादाला विशेष धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा गोदातीरी शंखनादाची शृंखला आयोजित करण्यात आली आहे. ता. २५ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी गोदातीरी ५११ हून अधिक भाविकांच्या सहभागातून सामूहिक शंखनाद करण्याचे कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येईल. त्यादृष्टीने तयारीने वेग घेतला आहे. ता. ३१ ऑक्टोबरला सिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनातही शंखनादाचा समावेश आहे. शंखनाद, गोदावरी आरती, दीपप्रज्वलन आणि कुंभगीत अशा विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन असून, रामतीर्थ, कुशावर्त आणि नीलपर्वत परिसरात धार्मिक कार्यक्रमांमध्ये शंखनाद होईल. ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात रामतीर्थावर ११ जूनला झालेल्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाने झाली होती. आता ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने सिंहस्थाची सुरुवात होणार आहे. कोजागरी पौर्णिमेचा शंखनाद सोहळा हा गोदातीरावर भव्य स्वरूपात होणार असून, यादृष्टीने नाशिकमधील शंखनाद पथके तयारीला लागली आहेत. एकाच वेळी ५११ शंखांचा नाद यापूर्वी कधी झालेला नाही. त्यामुळे हा अभूतपूर्व सोहळा असेल. शंख मंगलतेचे प्रतीक भारतीय धार्मिक परंपरेत शंख हा मंगलतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. पूजा, आरती, यज्ञ आणि धार्मिक सोहळ्यांच्या प्रारंभी शंखनाद करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या तयारीत होणारा हा शंखनाद केवळ विक्रमाचा प्रयत्न न राहता गोदातीरी धार्मिक पर्वाच्या प्रारंभाचा निनाद ठरेल. वैष्णव परंपरेत शंखाला विशेष स्थान आहे. भगवान विष्णूंच्या चार आयुधांपैकी शंख एक आहे आणि श्रीकृष्णाच्या ‘पांचजन्य’ शंखाचा महाभारतात स्पष्ट संदर्भ येतो. त्यामुळे शंखनाद हा केवळ आवाज नसून, धर्मकर्माच्या प्रारंभाची घोषणा असा त्याचा सांस्कृतिक अर्थ विकसित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com