लोकअदालतीमधून महसूली प्रकरणांचा निपटारा

लोकअदालतीमधून महसूली प्रकरणांचा निपटारा
Published on: 
31479 नाशिक : महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील. समवेत पक्षकार व त्यांचे वकील. लोकअदालतीमधून महसूली प्रकरणांचा निपटारा अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील; पक्षकारांचा उस्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सरकारच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत पक्षकारांमध्ये परस्पर संवाद आणि सामंजस्यातून तडजोडीअंती प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.५) अपर जिल्हाधिकारी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकअदालत पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील नाशिक शहर व ग्रामीण, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांशी संबंधित प्रलंबित अर्धन्यायिक महसूल प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आली. यावेळी पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात पक्षकारांमध्ये परस्पर संवाद व सामंजस्य घडवून आणत, त्यांच्या स्वेच्छेने प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणत त्यांचा निपटारा केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद, सुलभ व तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकअदालतीमुळे नागरिकांचा वेळ, श्रम व खर्च वाचण्यास मदत होत आहे. पक्षकारांमधील संवाद, सामंजस्य व परस्पर संमतीच्या माध्यमातून महसूल विवाद निकाली काढण्यासाठी हे प्रभावी व्यासपीठ ठरते आहे, अशा विश्‍वासही प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. --- महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत पुढील टप्प्यातही प्रलंबित महसूली प्रकरणांचा तडजोडीने निपटाऱ्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. - हेमांगी पाटील, अपर जिल्हाधिकारी, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com