पान-१ ॲंकर
YEO26B27286
राजापूर : ओल्या मकाची चाऱ्यासाठी कुट्टी करून साठवणूक करताना शेतकरी.
----------------
३६-५
मका सोंगणी करून देतो, पण चारा आम्हांला द्या
------------
पशुपालकांची विनंती ः येवल्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, मक्याचे उत्पादन घटल्याने काढणेही परवडेना
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२३ : सुरुवातीपासूनच पावसाने दगाबाजी केल्याने तालुक्यात तब्बल ४७ हजार हेक्टरवर घेतलेल्या मक्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मका चांगला तर काही ठिकाणी ५० टक्के नुकसान झाले आहे. पाणी नसलेल्या भागात फक्त मकाचे ताटेवाढले आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी पशुपालकांना मका चाऱ्यासाठी उपयोगात येत असल्याने अनेक पशुपालक चारा घेऊन शेतकऱ्यांची मका सोंगणी व बीटा काढणी करून देत आहे.
--------------
तालुक्यात ७५ हजार ५४६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली, यातील तब्बल ४७ हजार हेक्टरवर मकाचे पीक घेतले गेले होते. सर्वाधिक क्षेत्रावर घेतलेल्या मक्याला सुरवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहे. सुरवातीला रिमझिम पावसावर मकाचे पीक वाढले खरे पण नंतर मात्र पावसाअभावी वाढच खुंटली. शेतात फक्त ताट्यांचा सांगाडा उभा असल्याने आता सोंगणी परवडणारी नसल्याने शेतकरी चारा घेऊन जा, मका सोंगणी करून द्या..या गणिताने माकाची सोंगणी करत आहेत. वाढ निम्म्याने खुंटली शिवाय बिट्याच न लागल्याने व अल्प प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादनात विक्रमी घट झाली आहे. सोंगणी करणेही न परवडणारे झाले आहे. चाऱ्याचा प्रश्न असल्याने दोन्ही बाजूने नामी शक्कल लढवली जात आहे. चारा घेऊन जा, सोंगणी करून द्या या हिशोबाने मकाची काढणी सुरू आहे. विशेष म्हणजे चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकरी स्वतःहून सोगणीसाठी पुढे येऊन चारा नेत आहे. यावर्षी वाळलेला चारा मिळणे दुरापास्त झाले असून गावोगावी अनेक दुग्ध व्यावसायिक असून त्यांनाही येणाऱ्या दहा महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे असे दुग्ध व्यावसायिक कुटुंबातील सदस्यांना घेऊन मका उत्पादकांची मका काढणी करून देत त्याबदल्यात चारा घेऊन साठवण करून ठेवत आहे.
-----------
कोट
शेतातील पिकांची पाण्याअभावी वाताहात झाली असून पुढील पावसाळ्यापर्यंत जनावरांना चारा कसा पुरवावा हा प्रश्न आहे.स्वतच्या गायी व इतर जनावरे असल्याने सोंगणीच्या बदल्यात चारा उपलब्ध करून ठेवत आहोत. अनेक जण चारा द्या, आम्ही मका काढून देतो या ऑफर देत असल्याने पशुपालक नसलेले शेतकरी चारा देऊन मकाची काढणी करून घेत आहे.
- पोपट बोडके, शेतकरी, राजापूर
----------
मकाचे आकडे
- क्षेत्र : ४७ हजार २९० हेक्टर
- उत्पादक शेतकरी - सुमारे २० हजार
- एकरी उत्पादन : ७ ते २० क्विं.
- सोंगणीची मजुरी : ४ ते ६ हजार प्रती एकर किंवा चारा
- चारा : दरवर्षी चार,यंदा दीड-दोन ट्रॉलीपर्यत
------------