महिलांना अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या तरूणाला अटक

महिलांना अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या तरूणाला अटक
Published on: 
मालेगावला वेगवेगळ्या कारवाईत कुत्ता गोली, पिस्तुल जप्त; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २३ : पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाईत कुत्ता गोळी, गावठी पिस्तूल जप्तची कारवाई करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. पहिल्या कारवाईत पवारवाडी पोलिसांनी कोरेक्स औषधांच्या १०० बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी उबेदुर रहेमान अतीकुर्रहमान उर्फ इम्रान (२६, मदनीनगर) अतीक अहमद रफीक अहमद (२५, जमहूरनगर) या दोघांना अटक केली. सदर औषधी बाटल्यांचा नशेसाठी वापर होत होता. सुरतहून आणलेल्या या औषधी बाटल्यांची विनापरवाना व बेकायदा खरेदी विक्री होत असल्याने कारवाई करण्यात आली. तसेच इरफान मोहंमद इस्लाम (३१, खलील हायस्कूल) याच्या जवळून अल्प्राझोलमच्या २१० गोळ्या (कुत्ता गोळी) जप्त केल्या. इरफानने धुळे येथून गोळ्या आणल्याचे तपासात उघड झाले. दुसऱ्या एका कारवाईत महाज अमीर मोहंमद मुस्तफा (२२, रसुलपूरा), गुफरान रिजवान अहमद (२३, जाफरनगर) यांच्याकडून ५१७५ अल्प्राझोलम गोळ्या (कुत्ता गोळी) व दुचाकी जप्त केली. त्यांना अटक करण्यात आली आहे. गोल्डननगर भागातून मोहम्मद रिजवान शब्बीर याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून २५ हजारांची गावठी पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. मोहम्मद रिजवानने सदर पिस्तूल उत्तरप्रदेश मधून आणल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे श्री. गुंजाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com