मालेगाव तालुका कॉंग्रेसतर्फे काळा दिवस पाळून निवडणूक आयोगाचा निषेध

मालेगाव तालुका कॉंग्रेसतर्फे काळा दिवस पाळून निवडणूक आयोगाचा निषेध
Published on: 
फोटो -16065 मालेगाव : तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद खैरनार व पदाधिकारी. ----- मालेगाव तालुका काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाचा निषेध सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ८ : दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेशकुमार यांच्या आयुक्त पदाचा राजीनामासाठी कॉंग्रेसतर्फे आंदोलन सुरू होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली. त्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. या संदर्भात मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार विशाल सोनवणे यांची भेट घेत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. त्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दंडांवर काळ्या फिती बांधून दिल्ली पोलिसांचा निषेध केला. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. हे सरकार पोलिसांना पुढे करून दडपशाही आणण्याचा प्रकार करीत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. आगामी काळातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नेत्यांशी व जनप्रतिनिधींशी पोलिसांनी सन्मानपूर्वक वागावे यासह विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर श्री. खैरनार, कैलास पाटील, प्रसाद गोलाईत, मधुकर सावंत, राहुल चव्हाण, भारत देवरे, यशवंत शेवाळे, मधुकर बच्छाव, जयवंत वाघ, नारायण वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com