(धुळे- नंदुरबार पानासाठी मेन)
फोटो : NSK26H31474
नंदुरबार : गौरव सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित शिरीष चौधरी, डॉ. रवींद्र चौधरी, रेखा चौधरी यांच्यासह उपस्थित मान्यवर
----------------
घरातील एक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचावा
शिरीष चौधरी : नंदुरबार शहर तैलिक समाजाचा गौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ५ : प्रत्येक घरातील एक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचला पाहिजे. आई- वडिलांनी आणि समाजाने पाहिलेले स्वप्न विद्यार्थ्यांनी पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार तथा नंदुरबार शहर तैलिक समाजाचे अध्यक्ष शिरीष हिरालाल चौधरी यांनी केले.
----------
नंदुरबार शहर तैलिक समाजाचा २६ वा विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा श्री गजानन महाराज मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री. चौधरी बोलत होते. प्रारंभी संताजी महाराज व स्व. काकासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिरीष चौधरी म्हणाले, संत शिरोमणी प. पू. संताजी जगनाडे महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्र तेली समाजाचे भूषण स्व. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या प्रेरणेतून गेल्या २६ वर्षांपासून हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला जात आहे. या उपक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उंचावत आहे. समाजातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीष चौधरी, नगरसेवक ॲड. गौरव चौधरी, पंकज चौधरी, गौरव चौधरी, नगरसेविका शोभा चौधरी व रेखा चौधरी, पोलिस निरीक्षक योगेश चौधरी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर विनोद लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्राचार्य कैलास चौधरी, प्रा. डॉ. विजय चौधरी आणि महाराष्ट्र वनविभागाचे लेखापाल पंकज सुनील चौधरी यांचा समाजातर्फे गौरव करण्यात आला.
उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, प्राचार्य के. एस. चौधरी, प्रा. व्ही. झेड. चौधरी, विनोद लांजेवार, प्रा. रमेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजातर्फे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. गुणवंत विद्यार्थिनी डॉ.पूजा चौधरी, सिद्धी चौधरी, दिनेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हिरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी मोठे झाले, तर समाजाची प्रगती, प्रतिष्ठा वाढते. स्व. काकासाहेबांनी दिलेल्या संस्कार व विचारांच्या प्रेरणेतूनच हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा अविरत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास ईश्वर चौधरी, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, मोहन चौधरी, भरत चौधरी, डॉ. तेजल चौधरी, ॲड. उमा चौधरी, मनीषा चौधरी, अनिता चौधरी, धर्मराज चौधरी, नयन चौधरी, गौरव चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. हिरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी यांच्या सौजन्याने समाजातील गरजू व होतकरू २०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. सभामंडपासाठी देविदास चौधरी यांचे सौजन्य लाभले. प्रा. गणेश पवार व माधवी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अनिल चौधरी यांनी आभार मानले.