NSK26H34968
नंदुरबार : दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमास उपस्थित नंदुरबार शहरातील विविध कलाकार.
---
दिवाळी पहाट पाडव्याला
रंगली सुरांची मैफल
नंदुरबार, ता. १४ : दिवाळी पहाट पाडव्यानिमित्त लायन्स ग्रुप आणि संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम येथील हि. गो. श्रॉफ विद्यालयाच्या प्रांगणावर रंगला. कार्यक्रमात शहरातील स्थानिक कलाकारांनी विविध प्रकारची भक्तिगीते आणि भावगीते सादर करून रसिकांची मने जिंकली. यामुळे पाडव्याची पहाट श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक संजय महाजन, चंद्रशेखर चव्हाण, लायन्सचे अध्यक्ष किरण पाटील, रागिणी पाटील, अनिल पाटील, डॉ. सुहास भावसार, संकल्प ग्रुपचे कैलास मराठे, सारंग रोकडे, डॉ. माधव कदम, पंकज पाठक, चंपालाल चौधरी, सतीष पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अर्णव पाटील या कलाकाराने बासरीवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याला निशांत बोरसे, पुष्कर पाटील यांनी बासरीवर, तर मोहित वारुडे यांनी तबल्यावर साथ दिली. या वेळी नीलेश चव्हाण, प्रग्नेश दवे, पूनम बेडसे, रणजित राजपूत, चेतना पाटील, मीनल म्हसावदकर, राकेश कलाल, चंद्रशेखर चव्हाण, डॉ. राजेश कोळी, डॉ. संदीप बोरसे, डॉ. अविनाश पाटील, प्रा. शुभांगी देवकर, डॉ. जयंत शहा, रवी सूर्यवंशी, दिनेश वाडेकर, डॉ. संदीप बोरसे, डॉ. गौरवी बोरसे आदींनी विविध गीते सादर केली. डॉ. रोशन भंडारी, सुरेश जैन आदींचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला डॉ. श्रीराम दाऊतखाने, विजय पवार, अजय वळवी, नितीन चिनावलकर आदींसह रसिक श्रोते उपस्थित होते. चेतना पाटील, पूनम बेडसे, मिनल म्हसावदकर, डॉ. गौरवी बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. संकल्प ग्रुपचे अध्यक्ष कैलास मराठे यांनी आभार मानले.