पान-१ अँकर
फोटो : 33359
नंदुरबार : विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करताना.
----------------
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश
नंदुरबार पालिका शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप
नंदुरबार, ता. २३ : पालिका शिक्षक संघातर्फे कापडी पिशवीवाटप उपक्रम उत्साहात पार पडला. ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. शहरातील पालिका शाळा क्रमांक १, ३, ७ आणि १२ मधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचेया वेळी वाटप करण्यात आले.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळावे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षक संघातर्फे हा उपक्रम राबविला जातो. उपक्रमाप्रसंगी संघटनेचे राज्य संघटक करणसिंग चव्हाण, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष शिरीष पवार आणि नंदुरबार जिल्हाध्यक्ष सचिन आव्हाड उपस्थित होते. महिला आघाडीप्रमुख नूतन सावंत, जिल्हा सचिव मयूर सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोषकुमार सदाराव, सुजितकुमार पांडे आणि पालिका शाळा क्रमांक ३ चे मुख्याध्यापक फिलिप मावची यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. दैनंदिन वापरात प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. परिसरात प्लॅस्टिकचा वापर करू नये, असा संकल्प विद्यार्थ्यांनी या वेळी केला.
कोट----
पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक मुक्तीचे महत्त्व पटवून दिले तर सुंदर व हरित भविष्य घडवता येईल. शिक्षक संघ यापुढेही असे समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील, अशी प्रतिक्रीया शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.