

Nashik News : इगतपुरी शहर, ता. २१ : तालुक्यातील भावली धरणात मंगळवारी (ता. २१) सायंकाळच्या वेळेस पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवक- तीन युवतींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. (5 people drowned in Igatpuris Bhavli dam)
मृतात अनस दिलदार खान (वय १७), नाझिया इम्रान खान (१५), मिजबाह दिलदार खान (१६), हनीफ अहमद शेख (२४), ईकरा दिलदार खान (१४) यांचा समावेश आहे. नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील काही जण चारचाकी वाहनाने (एमएच १५ जेए २९६१) भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.
सायंकाळच्या सुमारास यातील दोन युवक अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता बुडत असल्याचे पाहून वाचविण्यासाठी इतर तीन युवतींनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, सर्व पाच जण बुडाले. स्थानिक आदिवासी तरुणांनी पाच मृतदेह पाण्याबाहेर काढले. (latest marathi news)
घटनास्थळी पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेऊन मदतकार्य करीत हे सर्व मृतदेह जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची रुग्णवाहिका, ठाकूर रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गोसावीवाडीतील आप्तस्वकियांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी करीत आक्रोश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.