Nashik Dwarka Chowk : द्वारका चौफुली बंद असल्याने नाशिककर करतायत 'ही' मोठी चूक! स्कूल बसच्या अपघातानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? पोलिसांसमोरच नियमांची पायमल्ली

Nashik traffic congestion due to road work : द्वारका चौकातील भुयारी मार्गाच्या कामांमुळे वाहतूक कोंडी वाढली असून उलट दिशेने वाहन चालविल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
What caused traffic congestion at Dwarka Chowk?

What caused traffic congestion at Dwarka Chowk?

esakal

Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत; तर द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे द्वारका चौफुली वाहतुकीसाठी बंद आहे. दुसरीकडे मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल दुचाकी- रिक्षांसाठी प्रवेश बंदी (Nashik Dwarka Chowk wrong way driving) असताना शहरातील वाहतूक कोंडीचा ससेमिरा टाळण्यासाठी ‘शॉर्टकट’चा अवलंब करीत स्वतःसह सहप्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जातो. उघड-उघड वाहतूक नियमांची पायमल्ली होत असताना, शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोयीस्कररीत्या याकडे डोळेझाक मात्र केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com