नाशिक कारागृहात पुनर्वसनाच्या नव्या उपक्रमांची सुरुवात: फीडिंग रूम, रेडिओ परवाझ आणि ब्युटिशियन कौशल्य केंद्राचे उद्घाटन

नाशिक कारागृहात पुनर्वसनाच्या नव्या उपक्रमांची सुरुवात: फीडिंग रूम, रेडिओ परवाझ आणि ब्युटिशियन कौशल्य केंद्राचे उद्घाटन
Published on: 
फोटो : H31440 नाशिक रोड : मध्यवर्ती कारागृहात विविध सुविधा केंद्राचे उद्‌घाटन करताना जिल्हा न्यायाधीश आर. एन. रोकडे. समवेत मान्यवर. -- महिला बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी विविध सुविधा फीडिंग रूम, रेडिओ परवाझ आणि ब्युटिशियन कौशल्य केंद्राचे उद्‌घाटन नाशिक, ता. ५ : महिला बंदींचे पुनर्वसन, कौशल्य विकास आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी डॉ. किरण बेदी यांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया व्हीजन फाउंडेशन’ आणि एसएलबी कॉर्पोरेट यांच्या सहकार्याने नाशिक कारागृहात विविध नवीन सुविधांचे उद्‌घाटन करण्यात आले. फाउंडेशनच्या विश्‍वस्त सायना आर. भरुचा आणि संचालक मोनिका धवन यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत कारागृहाच्या बाहेरील परिसरात बंदिवानांच्या कुटुंबीयांसाठी, महिला अभ्यागतांसाठी तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र फीडिंग रूम सुरू करण्यात आली आहे. लहान मुलांसह येणाऱ्या मातांना सुरक्षित व स्वच्छ जागा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच, महिला कारागृहात ‘रेडिओ परवाझ’ आणि ‘ब्युटिशियन कौशल्य केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. रेडिओ परवाझच्या माध्यमातून महिला बंदींना संगीत, सर्जनशील कार्यक्रम व जनजागृतीद्वारे आपले कलागुण व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळेल. तर ब्युटिशियन केंद्रात मिळणाऱ्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे सुटकेनंतर महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. या सुविधांचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी पियुष प्रसाद आणि जिल्हा न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी आर. एन. रांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस उपायुक्त किशोर काळे, तसेच जिल्हा वूमन ॲन्ड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर सुनील दसाने, इंडिया व्हीजन फाउंडेशनच्या सायना आर. भरुचा, मोनिका धवन उपस्थित होते. तसेच नाशिक कारागृह प्रशासनाच्या वतीने कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, वरिष्ठ कारागृह अधिकारी नेहा गुजराथी आणि कारागृह अधिकारी पूर्णिमा पालोडकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महिला बंदींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी इंडिया व्हीजन फाउंडेशन आणि कारागृह प्रशासन संयुक्तपणे कटिबद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com