शौचालय दुरुस्तीसाठी समाजमंदिरांचा निधी वळवा

शौचालय दुरुस्तीसाठी समाजमंदिरांचा निधी वळवा
Published on: 
टूडे साठी -------------- शौचालय दुरुस्तीसाठी समाजमंदिरांचा निधी वळवा महापालिका आयुक्तांचे आवाहन; स्थायी समितीची बैठक गाजली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि महापालिकेच्या घरकुल योजनेतील गैरप्रकार या मुद्द्यांवरून गुरुवारी (ता. २२) स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली. शहराची प्रतिमा मलिन करणाऱ्या शौचालयांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी नगरसेवकांनी समाजमंदिरे आणि समाजभवनांचे प्रस्ताव रोखून तो निधी शौचालयांकडे वळवावा, असे थेट आवाहन आयुक्त मनिषा खत्री यांनी केले. सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य योगेश गाडेकर यांनी देवळाली गावातील शौचालयांची दयनीय अवस्था छायाचित्रांसह सभागृहात मांडली. दरवाजे तुटलेले, दुर्गंधीचे साम्राज्य आणि देखभाली अभावी बंद पडलेली शौचालये, असा आढावा देत त्यांनी प्रशासनावर घोटाळ्याचा आरोप केला. माहिती अधिकारातही माहिती दिली जात नसून, सुलभ शौचालय संस्थेकडून नागरिकांकडून बेकायदा वसुली सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी लावून धरला. आयुक्त खत्री यांनी वस्तुस्थिती मान्य करताना सांगितले की, दुरुस्तीसाठी निधी अभावी अडचण आहे. प्रत्येक प्रभागात समाजमंदिरांसाठी आग्रह धरला जातो. त्यामुळे विकासकामांचा समतोल बिघडतो. नगरसेवकांनी रस्ते आणि शौचालये या दोन मूलभूत सुविधांनाच प्राधान्य दिल्यास निधीची चणचण भासणार नाही. -----------------चौकट घरकुलांचे सर्वेक्षण होणार घरकुल योजनेवरूनही गाडेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गरजूंना दिलेली घरे मूळ लाभार्थ्यांनी पोटभाड्याने दिल्याचा आरोप त्यांनी केला. याची गंभीर दखल घेत सभापती सानप यांनी तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले. बोगस लाभार्थी शोधून त्यांची घरे काढून घेऊन ती प्रतीक्षा यादीतील नव्या लाभार्थ्यांना देण्यात यावीत. सोबतच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या वसाहतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com