पान-३--मुख्य अंक
-------------
VNI26B13321
उमराळे ः नाशिक- पेठ रस्त्यावर डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेली आग.
----------
३०-२
उमराळेजवळ डंपर-दुचाकीत
अपघातानंतर दोघांना आग
----------
दुचाकीस्वार किरकोळ जखमी
----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२३ : नाशिक- पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी डंपरखाली गेल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. डंपर आणि दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत दुचाकीस्वार जयदेव विठ्ठल जाधव (२५) हे जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही
उमराळे बु येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी डंपरखाली गेल्याने दोन्ही वाहनांना आग लागली. डंपर (एमएच १५ डब्ल्यू ०२७६) आणि दुचाकी (एमएच १५, जेएल १०४२) यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी डंपरखाली गेल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीची तीव्रता वाढल्याने डंपर आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दोन्ही वाहने जळून खाक झाली. दुचाकीस्वार जयदेव विठ्ठल जाधव (२५) जखमी झाले आहे. पोलिसांनी तातडीने दखल घेत आग विझविण्यासाठी आवश्यक मदत मिळावी यासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिंडोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दिंडोरी येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तात्काळ पाठविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस हवालदार मोकळ आणि सूर्यवंशी तपास करीत आहेत.