Nashik Unseasonal Rain: 30 हजार एकरवरील द्राक्षबागांना फटका! अवकाळी अन्‌ गरपीटीच्या तडाख्यात कोट्यावधींचे नुकसान

Kailasrao Bhosle, Kshirsagar etc. while inspecting grapes damaged due to hailstorm.
Kailasrao Bhosle, Kshirsagar etc. while inspecting grapes damaged due to hailstorm.esakal
Updated on

निफाड : रविवारच्या अवकाळी पाऊस अन्‌ गरपीटीच्या तडाख्यात जवळपास ३० हजार एकरांवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. एक- दोन दिवसांत त्यात अजून वाढ झालेली दिसेल.

शासनाने भेटीगाठी अन्‌ पंचनामे, नुकसानभरपाईच्या गर्तेत द्राक्ष बागयतदारांना अडकविण्यापेक्षा द्राक्षबागांसाठी क्रॉप कव्हर व फळपीक विम्याच्या योजनेस गती दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केली आहे. (Nashik Unseasonal Rain 30 thousand acres of vineyards hit Loss of crores due to bad weather and drought)

निफाड तालुक्यातील अवकाळी पाऊस अन्‌ गारपीटग्रस्त भागात कैलासराव भोसले, लासलगाव बाजार समितीचे सभापती क्षीरसागर यांच्यासह द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून द्राक्ष बागायतदारांशी अडीअडचणींबाबत संवाद साधला.

शिवडी, सोनेवाडी, निफाड, रसलपूर, पिंप्री, रौळस, पिंपळस रामाचे, कोठुरे , मौजे सुकेणे, खेरवाडी, सय्यद पिंप्री आदी भागांतील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर कैलासराव भोसले यांनी द्राक्ष बागायतदारांची कैफियत मांडली.

नवीन फुटवा असलेल्या, फुलोरा अवस्थेतील, तसेच परिपक्व होत असलेल्या अशा सर्वच द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे द्राक्षवेलीला अंतर्गत व बाह्य जखमा झाल्या आहेत.

त्या भरून निघणार नाहीत. जमिनीवरही गारांचे थर साचून राहिल्याने जमिनीचा पोत ढासळणार आहे. गारपीटग्रस्त भागात एनआरसीच्या शास्त्रज्ञांचा अभ्यास दौरा आयोजित करून गारपीटीनंतरचे द्राक्षबागांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

शासनाने द्राक्ष बागायतदारांची सद्यस्थिती पाहता द्राक्षवेलीवेरील वर्षभराचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे त्या द्राक्षबागेला पुढील दीड वर्षापर्यंत केवळ संगोपन करण्याचा खर्च करावा लागणार आहे. भांडवलाची कमतरता होणार आहे.

Kailasrao Bhosle, Kshirsagar etc. while inspecting grapes damaged due to hailstorm.
Unseasonal Rain Damage: संकटकाळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे; अनिल पाटील यांची ग्वाही

त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करावी, गारपीटीपासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरची योजना केवळ शंभर हेक्टरवर न राबविता मागेल त्या द्राक्ष बागायतदारास क्रॉप कव्हर दिले पाहिजे.

त्यासाठी पात्रतेच्या अटी व शर्थी किचकट नसाव्यात, एक रुपयात पीकविमा या शासनाच्या योजनेत फळबागांचा समावेश करावा, त्याचा दर हजार रुपये केला, तरी त्यासाठी द्राक्ष बागायतदार तयार राहतील.

शेतपंपाची कुसूम योजना सर्वच शेतकरी पात्र ठरतील, अशा सौम्य अटींसह द्यावी, अवकाळी अन्‌ गारपीटीचे संकट न पेलविणारे आहे, यातुून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफी देऊ‌न नवीन कर्जपुरवठा शासनाने दिला पाहिजे, अशा मागण्या श्री. भोसले यांनी केल्या.

वेळ पडल्यास द्राक्ष बगायतदांचा विराट मोर्चा काढून शासनाला जागे केले जाईल, असेही कैलासराव यांनी स्पष्ट केले.

या पाहणीत नाशिक विभाग अध्यक्ष ॲड. रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, संचालक ॲड. रवींद्र बोराडे, किशोर निफाडे, रावसाहेब‌ रायते, सोपान बोराडे, श्‍याम शिरसाठ, ॲड. रामनाथ शिंदे, बबनराव भालेराव, सुरेशमामा कळमकर, मनोहर थेटे, भाऊसाहेब गवळी, बापू भालेराव, ईश्वर महाले, नंदू पडोळ, बाळासाहेब कहांडळ आदींसह द्राक्ष बागायतदार सहभागी झाले होते.

Kailasrao Bhosle, Kshirsagar etc. while inspecting grapes damaged due to hailstorm.
Nashik Unseasonal Rain Damage: 33 हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा; सर्वाधिक फटका द्राक्ष पंढरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com