धुळे टुडे २ साठी...
---
श्रीमनुदेवी मंदिरात
नवरात्रोत्सवाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : मोहाडी उपनगरातील तिखी रोडवरील मनोकामनेश्वरी श्रीमनुदेवी मंदीरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मंदिर विश्वस्त मंडळ व भाविकांकडून जय्यत तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेला पहाटे पाचला महापूजा, महाभिषेक कार्यक्रम होईल. रोज सकाळी सात व सायंकाळी सातला महाआरती करण्यात येईल. १५ ऑक्टोबरला ललीता पंचमीनिमित्त सायंकाळी आरती नंतर कुमारीका पूजन होईल. १९ ऑक्टबरला अष्टमीच्या दिवशी नवचंडी यज्ञ, दुपारी बाराला महाआरती व महाप्रसाद. २० ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त सिमोल्लंघन शमी पूजनाचा कार्यक्रम होईल. २५ ऑक्टोबरला शारदीय कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मातेला दुग्ध प्रसादाचा नैवेद्य अर्पण केला जाईल. मनुदेवी मंदीराच्या नवरोत्रोत्सवाचे यंदा १२ वे वर्ष असून, देवी भक्तात उत्साहाचे वातावरण आहे. मंदिर परिसरात रोशणाई, भक्तांसाठी गरबा दांडीया, ओटी प्रसादासाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. हा नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी देवी भक्तांनी सह्योग करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत साळुंखे, उमेश चौधरी, जगदीश पाखले, ॲड. बाबा जोशी, नरेश चौधरी, ॲड. राकेश रनाळकर, विजय बाविस्कर, सुनील देशमुख, नंदू पाठक, अनिल वाणी, पंकज पिंगळे, एकनाथ चौधरी, महेश पिंगळे, भटू सातभाईं, चंदू पाटील आदींनी केले आहे.
---