नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापना साहित्याची दुकाने सजली

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापना  साहित्याची दुकाने सजली
Published on: 
फोटो - 16058 मालेगाव कॅम्प : मालेगावात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने. ----- मालेगावला घटस्थापना साहित्याची दुकाने सजली देवीच्या मूर्तीवर करागिरांचा अखेरचा हात सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. ७ : नवरात्रोत्सवाच्या तयारीला मालेगाव शहरसह परिसरात वेग आला आहे. येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवी मातेच्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजेचे विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. शहरात नवरात्र उत्सवासाठी वर्तुळाकार मंडप, रोषणाईने मंडळे सज्ज झाली आहेत. तसेच घरोघरी घटस्थापना करत नऊ दिवस उपवास करतात. घटस्थापनेसाठी महिलांची घरातील स्वच्छतेत भांडे, घर, कानाकोपरा स्वच्छ करण्याची लगबग सुरू आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात देवीच्या छोट्या मूर्ती तयार होऊन मोठ्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत आहेत. यंदा नवरात्रोत्सवासाठी मूर्तींची मागणी लक्षात घेता कारखान्यात दुर्गा देवी, महालक्ष्मी, सप्तशृंगीदेवी, अंबाबाई रेणुका देवी, तुळजाभवानी अशा विविध मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. छोट्या मूर्तींची किंमत प्रतिनग ५०० ते ७००० रुपयापर्यंत तर मोठ्या मूर्तींची किंमत पंधरा हजार ते पंचवीस हजारापर्यंत आहे. रात्री मंडळांमध्ये दांडिया, टिपरी खेळत आनंद साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात अगदी पहिल्या माळे ते नवव्या माळपर्यंत चक्रपूजा उत्सवात होते. घटस्थापनेच्या मुहूर्तावर नागरिक नवीन वस्तू, गाडी, मोबाईल, सोने, चांदी, खरेदी करतात. नवरात्र उत्सवातील पूजेचे साहित्य दगडी दिवा, डालकी, बोळके, ओटी, नारळ, वस्त्र, वात, देवीचा फोटो, हवन कुंड इ. वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांसह मंडळातील कार्यकर्ते यांची बाजारपेठेत लगबग सुरू आहे. ----- चौकट पूजेच्या साहित्याचे दर दगडी दिवा- २५० ते ३०० घट- २५-३० डालकी- २० पूजा साहित्य-३० नारळ-४० ओटी- ५० रंगीत वस्त्र- २५, वात- १० देवीचा फोटो - ५० ते १०० हिरवी साडी -१६० हवन कुंड -१०० ते १५० ----- कोट .... नवरात्रोत्सवासाठी लागणारे साहित्य बाजारात आले आहे. पूजेच्या वस्तूंचे दर या वर्षी वाढले आहेत. नारळ किमतीत वाढ झाली असून, नवीन साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. घटस्थापना व पूजा साहित्य खरेदीला पितृ पक्षसमाप्तीनंतर वेग येईल. - रवींद्र खैरनार पूजा साहित्य व्यावसायिक, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com