ncp sharad pawar party agitation
sakal
वणी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. ५) दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले.