निफाड ः मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम

निफाड ः मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम
Published on: 
NPH26B08778 निफाड ः शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम सुरु असताना.​ ---------- सकाळ बातमीचा परिणाम --------- ३०-२ मोकाट कुत्रे पकडण्याची निफाडमध्ये मोहीम सुरू ------------------- नागरिकांमधून समाधान, सातत्याची अपेक्षा ----------- ​सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.९ ः निफाड शहरात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा वाढलेला त्रास आणि नागरिक, लहान मुलांवर होणारे हल्ले याविषयी नागरिकांचा वाढलेला संताप आणि आंदोलनानंतर ‘सकाळ’ ने याप्रश्नाचा पाठपुरावा केला. यानंतर नगरपालिकेने शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यास सुरवात केली आहे. दरम्यान ही मोहिम सातत्याने सुरू राहावी आणि नागरिकांची या त्रासातून कायमची सुटका करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. -------------------- शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन तसेच निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी केलेली दिरंगाई, नागरिकांच्या अर्ज याकडे दुर्लक्ष, वारंवार तक्रार करूनही समस्या न सुटल्याने आक्रमक युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी थेट मुख्यधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलावर कुत्र्यांची पिले आणत असंवैधानिक प्रकारे निषेध नोंदविला होता. या घटनेनंतर नगरपालिकेनेही पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. मात्र त्यानंतरही याबाबत हालचाल दिसत नव्हती. ‘सकाळ’ ने याप्रश्नाचा पाठपुराव करत वृत्त दिले होते. त्यानंतर नगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम सुरु केली आहे. याचप्रश्नी माजी आमदार अनिल कदम, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, तालुकाप्रमुख खंडू बोडके, नगरसेविका रुपाली रंधवे, नगरसेवक सचिन गिते, गटनेते सुनील कदम, इतर नगरसेवक पदाधिकारींनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत चर्चा झाली. नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनही केले होते. -----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com