भोंदू खरात फसवणुकीच्या दुसर्या गुन्ह्यात अटक

भोंदू खरात फसवणुकीच्या दुसर्या गुन्ह्यात अटक
Published on: 
‘मोठा व्यापारी होणार’चे भाकीत; कांदा व्यापाऱ्याला ८५ लाखांचा गंडा भोंदू खरातला पुन्हा अटक; आज न्यायालयात आणणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : ‘भविष्यात मोठा व्यापारी होणार’ असे भाकीत करून नांदूरशिंगोटे येथील कांदा व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढत ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी भोंदू अशोक खरात याला पुन्हा अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. ९) संपत असल्याने खरातला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, महिलांच्या शोषणाच्या गुन्ह्यातील दोषनिश्चितीच्या खटल्याची गुरुवारची (ता. ८) सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरोधात महिलांच्या शोषणासह आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. नांदूरशिंगोटे येथील कांदा व्यापारी विशाल सूर्यभान बकरे यांच्या फिर्यादीनुसार, गौळाणे परिसरातील प्लॉटच्या व्यवहारातून ते खरातच्या संपर्कात आले. खरातने भविष्यात मोठा व्यापारी होण्याचे भाकीत करून त्यांना बांधकाम व्यवसायात येण्याचे आमिष दाखविले. तसेच, गौळाणे परिसरातील ६०० वारांचा प्लॉट देण्याचे सांगून जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत त्यांच्याकडून ८५ लाख रुपये घेतले. यापूर्वी वृद्धाश्रम सुरू करण्याच्या नावाखाली बकरे यांच्या गौळाणे येथील ६० लाख रुपये किमतीचा प्लॉट अवघ्या २२ लाख रुपयांना खरेदी केला. मात्र, तेथे वृद्धाश्रम सुरू केला नाही. त्यानंतर बांधकाम व्यवसायात मोठी संधी असल्याचे सांगून आणखी पैसे घेतले. रक्कम दिल्यानंतरही प्लॉट नावावर करून न दिल्याने बकरे यांनी पैशांची किंवा जमिनीची मागणी केली. त्यावेळी खरातने ‘देवाचा कोप होईल’ अशी भीती दाखवून त्यांना धमकावल्याचा आरोप आहे. खरातविरोधातील अन्य प्रकरणे समोर आल्यानंतर बकरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. सत्र न्यायालयातील सुनावणी २१ ला महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील दोषनिश्चितीच्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी होणार होती. मात्र, खरात फसवणुकीच्या प्रकरणात सरकारवाडा पोलिसांच्या कोठडीत असल्याने त्याला न्यायालयात हजर करता आले नाही. तसेच, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाचे वकील राहूल कासलीवाल अनुपस्थित असल्याने सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com