प्रजापत नगराला अस्वच्छतेचा विळखा; नियमित सफाईचा अभाव

प्रजापत नगराला अस्वच्छतेचा विळखा; नियमित सफाईचा अभाव
Published on: 
शहर टुडे ३ : मेन फिचर --- लोगो : नव्या वस्त्या; जुन्याच समस्या (हा लोगो ५ ऑक्टोबरच्या सीटी टुडे पान ३ वरून घ्यावा) NSK26H31641 जळगाव : प्रजापत नगरातील कच्चा रस्ता. -------------- NSK26H31642 उघड्यावर पडलेला कचरा. ------------- NSK26H31643 सांडपाणी जायला जागा नसल्याने मोकळ्या जागेवर साचलेले सांडपाणी. ------------- NSK26H31644 तुंबलेल्या गटारी व बाजुला पडलेला कचरा. प्रजापत नगराला अस्वच्छतेचा विळखा; नियमित सफाईचा अभाव नागरिकांनाच फेकावा लागतो कचरा; तुडुंब गटारी अन् बंद पथदीपांचा त्रास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न कायम असताना प्रजापत नगरातील नागरिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना स्वतःच कचरा उचलून फेकावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, तुडुंब भरलेल्या गटारी, बंद पथदीप आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. समस्यांबाबत निवेदन देऊनही आश्वासनापलीकडे ठोस पुढाकार होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. प्रजापत नगरातील अनेक भागांत नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी किंवा सफाई व्यवस्था वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना स्वतःच कचरा गोळा करून अन्य ठिकाणी टाकावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था वस्तीतील रस्त्यांची अवस्था खराब असल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. पावसाचे पाणी साचल्याने चिखल निर्माण होतो. खड्ड्यांमधून वाहन चालविताना दुचाकीस्वारांना अडचणी येतात, तर पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण होते. पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असल्याने कायमस्वरूपी रस्त्यांची मागणी होत आहे. गटारी तुडुंब; सांडपाण्याचा प्रश्न परिसरातील गटारी अनेक ठिकाणी तुडुंब भरलेल्या आहेत. गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्याने दुर्गंधीचा त्रास होत आहे. गटारींची नियमित साफसफाई न झाल्यास पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पथदीप बंद, रात्री अंधार परिसरातील काही पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. रस्त्यांची खराब अवस्था आणि त्यातच अपुरा प्रकाश यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना रात्री ये-जा करताना अडचणी येतात. बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी आहे. मोकाट कुत्र्यांचाही त्रास कचरा साचत असल्याने परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे लागणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येवरही महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. आश्वासनानंतरही ‘जैसे थे’ परिसरातील विविध समस्यांबाबत संबंधित प्रशासनाकडे नागरिकांनी निवेदन देऊन समस्यांकडे लक्ष वेधले आहे. समस्या सोडविण्याचे आश्वासनही मिळाले; मात्र प्रत्यक्षात अद्याप ठोस कामाला सुरुवात झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे केवळ आश्वासन न देता संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चौकट वाढीव वस्त्यांकडे लक्ष देण्याची मागणी शहराचा विस्तार होत असताना वाढीव वस्त्यांमध्ये नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र त्याच प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. प्रजापत नगरातील कचरा, गटारी, रस्ते, पथदीप आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. कोट प्रजापत नगरातील समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. नियमित सफाई होत नसल्याने नागरिकांनाच कचरा उचलून टाकावा लागतो. गटारी तुडुंब भरलेल्या आहेत, रस्त्यांची अवस्था खराब असल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणी येतात. काही ठिकाणी पथदीप बंद असून मोकाट कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. समस्यांबाबत निवेदन देऊन आश्वासन मिळाले, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाने पाहणी करून सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात. - मोहन तिवारी, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com